मुंबई - आमिर खानचा 'लापता लेडीज' 97व्या ऑस्कर पुरस्कारांमधून बाहेर पडला आहे. दरम्यान भारतासाठी अजूनही आशा आहे, कारण गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म 'अनुजा'ला या श्रेणीत निवडण्यात आलं आहे. हा चित्रपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता नागेश भोसले, सजदा पठाण, अनन्या शंभाग, गुलशन वालिया सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे.' अनुजा'ची 180 लघुपटांमधून निवड करण्यात आली आहे. आता अनेकांना 'अनुजा'कडून अपेक्षा आहेत.
'संतोष' चित्रपटाची झाली ऑस्करसाठी निवड : तसेच संध्या सुरीचा हिंदी चित्रपट 'संतोष' अकादमी पुरस्काराच्या टॉप 15 आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट केला आहे. आता फरक इतकाच आहे की, हिंदी भाषेतील या चित्रपटाचं प्रतिनिधित्व भारत नव्हे तर ब्रिटन करेल. इंडो-ब्रिटिश निर्माती संध्या सुरी यांनी 'संतोष' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी या चित्रपटाची कहाणी देखील लिहिली आहे. या चित्रपटामध्ये शहाना गोस्वामीनं एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. 'संतोष' चित्रपटात शहानाबरोबर संजय बिश्नोई, सुनीता राजवार, नवल शुक्ला, प्रतिभा अवस्थी आणि कुशल दुबे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग हे उत्तर भारतात करण्यात आलंय. 'संतोष' चित्रपटाला पहिल्यांदा कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आलं होतं. यावेळी या चित्रपटाचं भरपूर कौतुक करण्यात आलं होतं.
या चित्रपटांची निवड करण्यात आली : अमेरिकेत होणाऱ्या 97व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2025 मध्ये विदेशी फीचर फिल्म श्रेणीत 15 चित्रपट निवडले आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवलेल्या सुमारे 95 चित्रपटांपैकी फक्त 15 चित्रपटांची निवड ज्यूरीला करायची होती. यामध्ये 95 चित्रपटांमध्ये भारताच्या 'लापता लेडीज'चाही समावेश होता. मात्र आमिर खानचा 'लापता लेडीज'ला टॉप 15 मध्ये स्थान मिळवू शकले नाही. तसेच ब्राझीलचा चित्रपट 'आई एम स्टिल हियर', कॅनडाचा चित्रपट 'युनिव्हर्सल लँग्वेज', चेक गणराज्यचा 'वेव्ह्स', डेन्मार्कचा 'द गर्ल विथ द नीडल' आणि फ्रान्सचा 'एमिलिया पेरेज’ या चित्रपटांना अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेससाठी नामांकन मिळालं असून त्यांना टॉप 15 यादीत सामील केलं गेलं आहे. या चित्रपटांशिवाय जर्मनीचा 'द सीड ऑफ द सेक्रेड फिग’, आइसलँडचा 'टच', लॅटव्हियाचा 'फ्लो', आयर्लंडचा 'नी कॅप', आणि इटलीचा 'वर्मेग्लिओ' यांनाही अकादमी पुरस्कारांच्या परदेशी चित्रपट श्रेणीत स्थान दिलं गेलं आहे.
Presenting the 97th #Oscars shortlists in 10 award categories: https://t.co/Ite500TEEC
— The Academy (@TheAcademy) December 17, 2024
Find out who will be nominated on January 17th, and tune into @ABCNetwork and @Hulu to watch the Oscars LIVE on Sunday, March 2nd at 7e/4p. pic.twitter.com/lzc9xViWC7
- भारताशी संबंधित चित्रपटांचा केला गेला समावेश : तसेच ऑस्करसाठी पॅलेस्टाईनचा 'फ्रॉम ग्राउंड झिरो', सेनेगलचा 'दहोमेय', नॉर्वेचा 'आर्मंड', थायलंडचा 'हाउ टू मेक मिलियन बिफोर ग्रैंडमा डाइज' आणि ब्रिटनचा 'संतोष' या चित्रपटांनीही या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे.