कराड (सातारा) - गावातील मुलीला घरी बोलावून विनयभंग केल्याप्रकरणी नाणेगाव खुर्द (ता. पाटण) येथील आरोपीला कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन महिने सक्तमजुरी आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. राजदीप प्रभाकर रोकडे, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
२०१९ मध्ये घडली होती घटना -
गावातीलच मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजदीप रोकडे याच्यावर २०१९ मध्ये उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारापपत्र दाखल केले होते. न्या. एस.ए.ए.आर. औटी यांच्या खंडपीठापुढे या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे महत्त्वाचे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुरावे आणि सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. मिलींद कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्या. औटी यांनी आरोपीला दोषी धरून दोन महिने सक्तमजुरी आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा - जळगावात कोरोना लसीकरणाचा 'ड्रायरन', 25 आरोग्य कर्मचाऱ्यांची रंगीत तालिम