ETV Bharat / state

आरोग्याची एैशी की तैशी..!  माणमधील ग्रामीण रुग्णालयात सुरक्षारक्षक करतोय चक्क डॉक्टरांचे काम - सातारा

सातारा पंढरपूर रस्त्यावर रात्री अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याचे काम सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून अपघातग्रस्तावर उपचार करत होते. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

रुग्णांची तपासणी करताना सुरक्षारक्षक
author img

By

Published : Mar 17, 2019, 1:17 PM IST

सातारा - माण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून रुग्णांचे उपचार करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती नागरिकांना समजतात नागरिकांनी तसेच मनसे जिल्हाध्यक्षांनी दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यालयात रात्री दहा वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय सेवा कशी चालते हे समोर आले आहे.

मनसे जिल्हाध्यक्षांनी दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यालयात रात्री दहा वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले.

याबद्दल अधिक माहिती अशी की, सातारा पंढरपूर रस्त्यावर रात्री अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याचे काम सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून अपघातग्रस्तावर उपचार करत होते. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. हे समजताच मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी याबद्दल विचारणा केली असता त्यांना देखील उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आले.

यानंतर धैर्यशील पाटील व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलीस मध्यस्थी करीत असतानाच पोलीसांच्या गाडीतून एका आरोपीला या ठिकाणी तपासणीसाठी आले. त्याची त0पासणी करण्यासाठी कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी देखील आरोपीला गोंदवले येथील रुग्णालयाकडे हलवले. रात्री बाराच्या सुमारास पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन पाटील यांनी निवेदन देऊन मागे घेतले.

Intro:माण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसताना. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज घालून रुग्णांचे उपचार करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती नागरिकांना समजतात नागरिकांनी तसेच मनसे जिल्हाध्यक्षांनी ग्रामीण रुग्णालय दहिवडी मुख्यालयात ठिय्या आंदोलन रात्री दहा वाजता सुरू केले त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा कशी चालते हे समोर आले आहे.

Body:याबद्दल अधिक माहिती अशी की, सातारा पंढरपूर रस्त्यावरती रात्री अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांचे काम सुरक्षा रक्षक हातामध्ये हॅन्ड ग्लोज व सुरक्षारक्षकाच्या कपड्यावरून दुसरा शर्ट घालून अपघातग्रस्तावर उपचार करत होते. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता. ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. हे समजताच मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी याबद्दल विचारणा केली असता. त्यांना देखील उडवा उडवीची उत्तरे देण्यात आले, यावरती धैर्यशील पाटील व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यालयातच ठीय्या आंदोलन सुरू केले, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पोलीस मध्यस्थी करीत असतानाच पोलीस गाडीतून एका आरोपीला या ठिकाणी तपासणीसाठी आणले असता. त्याची देखील तपासणी करण्यासाठी कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी देखील आरोपीला गोंदवले येथील रुग्णालयाकडे हलवले. रात्री बाराच्या सुमारास पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन पाटील यांनी निवेदन देऊन मागे घेतले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.