ETV Bharat / state

पोलीस उपनिरीक्षकाशी वाद घालणाऱ्या आमदार गोरे गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल - Bjp Corporator news

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी म्हसवड महापालिका शहरात पोलिसांच्या मदतीने विनामास्क वावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. यावेळी नगरसेक अकिल काझींवर कारवाई करण्याची पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी पालिकेच्या पथकाला विनंती केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली.

spot photo
घटनास्थळावरील फोटो
author img

By

Published : May 11, 2020, 7:37 PM IST

सातारा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी म्हसवड नगरपरिषदेने विना मास्क रस्त्यावरुन फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी पालिकेने पोलीसांची मदत घेतली आहे. दरम्यान, कारवाई करत असताना नगरसेवक अकिल मैनुद्दीन काझी हे विनामास्क फिरताना दिसले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक अमोल कदम यांनी नगरसेवकावरही दंडात्मक कारवाई करण्याची सुचना पालिका कर्मचाऱ्यांना केली. त्यामुळे भाजप आमदार गोरे गटाच्या या नगरसेवकाने पोलीस उपनिरीक्षकासह वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.

दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित एका पत्रकाराने या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संबधित नगरसेवकांने पत्रकारांना फिरण्याचा परवाना कोणी दिला आहे अशी उलट विचारणाच केले. ते येवढ्यावर थांबले नाहीत तर पत्रकाराकडून कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही आमचे काम करतोय असे पत्रकारांनी ठणकावताच त्यांनी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गरळ ओकत त्या ठिकाणाहून धुम ठोकली.

सध्या या प्रकणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून संबधीत नगरसेवकावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम म्हसवड पोलीस करत आहेत. दरम्यान संबधित नगरसेवकावर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा - अवैध वाळू वाहतूक प्रकरणी खटावच्या चौघांवर गुन्हा दाखल; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.