ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा होणार - भुजबळ - नायगाव सावित्रीबाई फुले स्मारक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Savitribai Phule Anniversary
सावित्रीबाई फुले जयंती
author img

By

Published : Jan 3, 2021, 10:52 PM IST

सातारा - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा दिवस संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री व अन्न, नागरी पुरवठा मंत्री

हेही वाचा - काले गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन; पिंजरा लावण्याची मागणी

नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भुजबळ यांनी अभिवादन करून पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पहाणी केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फुले दांपत्याचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणार

महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिवस हा महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही. आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे. हे फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागातून शक्य झाले. अनेक अडचणींवर मात करून व समस्यांना तोंड देवून त्यांनी आपले काम अखंड सुरू ठेवले. त्यांचा जन्म दिवस आता महिला शिक्षण दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार, असे भुजबळ यांनी सांगितले.

आत्ता लागलेल्या शालेय, महाविद्यालयीन निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न करू. फुलेंचे विचार गाठीशी बांधून कार्य करू, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार व पणन, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी खासदार समीर भुजबळ आदींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले.

हेही वाचा - पोलीस अधीक्षक बन्सल यांना केंद्र व राज्याचा सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.