सातारा : कास धरणातून सातारा शहराला केला जाणारा पाणी पुरवठा ऐन उन्हाळ्यात विस्कळीत होणार आहे. सोमवारी सायंकाळी शहराच्या काही भागात पाणी येणार नाही तर मंगळवार, बुधवारी कमी-जास्त प्रमाणात अथवा अजिबात पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे तीन दिवस सातारकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
लिकेज आणि पणी टाक्यांची स्वच्छता : सातारा नगरपालिकेने केलेल्या आवाहनानुसार सोमवारी (दि. १७) कास धरणातील पाईपलाईनचे लिकेज काढणे तसेच मुख्य साठवण टाक्या साफ करण्याची कामे युद्धपातीवर हाती घेतली आहेत. त्यामुळे सोमवारी कास धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या कांबळे वस्ती, बालाजी अपार्टमेंट, समर्थ मंदिर परिसर तसेच कात्रेवाडा टाकीच्या भागातील नागरिकांना सोमवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन : मंगळवारी (दि.१८) आणि बुधवारी (दि. १९) पाणीपुरवठा कमी जास्त प्रमाणात अथवा अजिबात होणार नाही. त्यामुळे कोटेश्वर टाकी, भैरोबा टाकी वेंकटपुरा टाकी, कात्रे वाडा टाकी गुरुकुल टाकी या टाक्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
तांत्रिक कामांचा परिणाम : जानेवारी महिन्यात देखील दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहिला होता. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 11 केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहापूर पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे दि. १० आणि ११ जानेवारी रोजी दोन दिवस पाणी पुरवठा झाला नव्हता.
पाण्याचा काटकसरीने वापर : सातारा नगरपालिकेच्या वतीने साताराकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी 17 एप्रिल रोजी कास धरणातून येणाऱ्या पाइपलाइनची गळती दूर करणे, मुख्य साठवण टाक्यांची साफसफाई करणे अशी कामे पालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सातारा नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. सातारा नगरपालिकेकडून विविध कामे हाती घेतल्यामुळे सोमवारी कास तलावातून म्हणजेच कांबळी वस्ती, बालाजी अपार्टमेंट, समर्थ मंदिर परिसर, कात्रेवाडा टाकी या भागाला सायंकाळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कोटेश्वर टाकी, भैरोबा टाकी, व्यकंतपुरा टाकी, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सातारा नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.