ETV Bharat / state

वाई पोलीस ठाण्यातील 15 पोलीस कोरोनाबाधित; पोलीस अधीक्षकांची वाईला भेट - satara sp tejasavi satpute

वाई पोलीस ठाण्यातील पंधरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

satara sp
सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते
author img

By

Published : Jul 15, 2020, 11:56 PM IST

सातारा - पीपीई किट घालून रुग्णसेवा बजावणे अतिशय अवघड काम आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी सलग पाच-सहा तास किट्स घालून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टरांचे योगदान अमुल्य असल्याचे मत सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. त्या बुधवारी वाई येथील हॉस्पिटलमध्ये पोलीस ठाण्यातील पंधरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत त्यांना पाहण्यासाठी आल्या होत्या.

वाई पोलीस ठाण्यातील पंधरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने वाईला भेट दिली. उपचार सुरू असणाऱ्या संचित आयसीयू बी विंग रुग्णालयात जाऊन कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली.

यातील काही कर्मचाऱ्यांची कुटुंबीय ही कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कर्मचारी चिंता व्यक्त करत असताना संबंधित कर्मचारी रुग्णांना तुम्ही काळजी करू नका तुम्ही लवकरच ठणठणीत व्हाल, तसेच तुमच्या कुटुंबीयांसमवेत आम्ही आहोत, काळजी करू नका, असा दिलासा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी सुरक्षिततेसाठी पीपीई किट परिधान केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.