ETV Bharat / state

Satara Riots Case : सातार्‍यातील इंटरनेट सेवा तीन दिवसांनी पूर्ववत; दंगलग्रस्त पुसेसावळीतील तणाव निवळला - Pusesawali Riots Case

Satara Riots Case : साताऱ्यातील पूसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीमुळे (Satara Riots) जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तीन दिवस बंद (Internet service Down in Satara) होती. तणाव निवळल्याने रात्री बारा नंतर इंटरनेट सेवा (Internet Service) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच पुसेसावळी गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Internet service restored in Satara
सातार्‍यातील इंटरनेट सेवा पूर्ववत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 10:25 AM IST

सातारा : Satara Riots Case : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दंगल (Satara Riots Case) उसळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा (Internet Service) गेली तीन दिवस बंद (Internet service Down in Satara) करण्यात आली होती. आता दंगलग्रस्त भागातील तणाव निवळला असून बाजारपेठेसह सर्व व्यवहार आजपासून पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवाही पुन्हा सुरू करण्यात आली. तर अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कारवाईच्या आश्वासनामुळे बंद मागे : पुसेसावळी दंगलीमध्ये जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने आश्वस्त केल्यानंतर पुसेसावळी गावातील बंद मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारपासून ठप्प असलेले व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. दंगल झालेल्या पुसेसावळी गावात पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावर सायबर सेलचे लक्ष असून सामाजिक शांतता धोक्यात येईल, अशा पोस्ट कोणीही टाकू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विक्रम पावसकरांच्या सुरक्षेत वाढ : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pavaskar) हे दंगलीचे सूत्रधार असून त्यांना अटक करण्याची मागणी अल्पसंख्यांक समाजाने केली होती. त्यानंतर बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन दंगलीच्या गुन्ह्यात विक्रम पावसकर यांना गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांचा आणि त्यांना संरक्षण देणार्‍यांचा पीएफआयशी (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर विक्रम पावसकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कराड शहरातही बंदोबस्त तैनात : या परस्परविरोधी आरोपांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कराड शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गोपनीय विभागही हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. वरिष्ठ अधिकारी सातत्याने सर्व जाती-धर्मातील प्रतिष्ठीतांच्या बैठका घेऊन सामाजिक सलोखा आणि शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राखीव दलाच्या तुकड्याही कराडमध्ये दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा -

  1. Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
  2. Satara Riots : साताऱ्यातील दंगलीप्रकरणी २३ संशयित ताब्यात; इंटरनेट सेवा मात्र बंदच
  3. Satara Riot News: दंगलीतील मृत तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी १३ तासांनी घेतला ताब्यात, साताऱ्यात विविध संघटनांचा मूक मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.