ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी 3 हजार 124 जणांना डिस्चार्ज; 1 हजार 875 नवे रुग्ण - satara corona patients

साताऱ्यात शुक्रवारी 1 हजार 875 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. शुक्रवारी 31 बाधितांचा मृत्यु झाला आहे.

satara hospital
satara hospital
author img

By

Published : May 21, 2021, 9:57 PM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 124 न‍ागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. तर शुक्रवारी 1 हजार 875 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. शुक्रवारी 31 बाधितांचा मृत्यु झाला आहे.

17 हजार 710 रुग्ण घेताहेत उपचार

याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 3124 नागरिकांना घरी सोडण्यात आले. 17 हजार 710 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

आत्तापर्यंत 1 लाख 23 हजार 770 रुग्ण बरे झाले आहेत.

साताऱ्यात वाढती संख्या

कालपासून आढळलेले कोरोनाबाधितांची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे- जावली 53, कराड 248 , खंडाळा 98, खटाव 260, कोरेगांव 156, माण 117, महाबळेश्वर 13, पाटण 63, फलटण 372, सातारा 394, वाई 82 व इतर 19 असे एकूण 1 हजार 875 नवे रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

सातारा व खंडाळ्यात मृत्यू अधिक

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावली 1, कराड 3, खंडाळा 6, खटाव 4, कोरेगांव 2, माण 1, महाबळेश्वर 1, पाटण 1, फलटण 1, सातारा 8, वाई 3 यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 3 हजार 359 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.