ETV Bharat / state

सातारा पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन,अनेक गुन्हेगारांवर कारवाई; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त - satara Gram Panchayat General Election

आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन राबवले होते. यावेळी विविध गुन्ह्यातील हिस्ट्रीशिटर, तडीपार, वॉटेंड अशा २८ जणांवर तसेच १९ धाबे, हॉटेल, १३ दुचाकींसह ४४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.

police combing operation in satara
सातारा पोलीस कोंम्बिंग ऑपरेशन
author img

By

Published : Dec 26, 2020, 7:21 AM IST

सातारा - आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन राबवले होते. यावेळी विविध गुन्ह्यातील हिस्ट्रीशिटर, तडीपार, वॉटेंड अशा २८ जणांवर तसेच १९ धाबे, हॉटेल, १३ दुचाकींसह ४४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, लिंब, तालुका सातारा येथे अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करून सव्वा पाच लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.

झोपडपट्टयांमध्येही कोंबिंग ऑपरेशन
सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी, मंगळवार पेठ, बोगदा परिसर, इंदिरानगर, लक्ष्मी टेकडी, अजंठा झोपडपट्टी, रविवारपेठ, माची पेठ, केसरपेठ आदी ठिकाणी गुरुवारी सायंकाळी कोम्बींग ऑपरेशन राबवले. यावेळी चार हिस्ट्रीशिटर, 14 माहितगार गुन्हेगार, चार आरोपी, चार हद्दपार व्यक्ती, दोन गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या दोघांवर कारवाई केली. तसेच 19 हॉटेल्स, लॉज, धाबा, 31 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
अवैध दारू जप्त
कोम्बींग ऑपरेशनदरम्यान लिंब याठिकाणी वाहनातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर त्याठिकाणी छापा टाकला. त्यात ५ लाख ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी अमोल प्रकाश अहिरेकर, मौला शेख यांना अटक करुन त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रचंड फौजफाटा
या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये चार पोलीस अधिकारी, 45 पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालयातील क्युआरटीचे 15 जवान, आरसीपीचे 10 पोलीस अंमलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील एक पोलीस अधिकारी व चार पोलीस अंमलदार असे एकुण सहा पोलीस अधिकारी व 74 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा - 'कोरोना-२'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत शोधाशोध सुरू; महिनाभरात परदेशातून आले ४,०९३ प्रवासी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.