ETV Bharat / state

लोकनेत्यांच्या नातवाने शेण खाल्ले..राऊतांची टीका झोंबली; शंभूराज देसाईंनी पत्रक काढून दिला 'हा' इशारा...

पाटण दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका पालकमंत्री शंभूराज देसाईंना चांगलीच झोंबली आहे. पालकमंत्र्यांनी देखील शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या नावे पत्रक काढून बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान न थांबविल्यास लोकनेत्यांचे कार्यकर्ते तुमच्या तोंडात शेण घालतील, असा इशारा संजय राऊतांना दिला आहे.

rautshambhu
rautshambhu
author img

By

Published : Jun 26, 2023, 10:17 PM IST

सातारा - पाटण दौर्‍यावर आलेल्या ठाकरे गटाच्या उपनेते खासदार संजय राऊत यांनी सातार्‍याचे पालकमंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. लोकनेत्यांचे योगदान आम्ही विसरणार नाही, पण त्यांच्या नातवाने शेण खाल्ले, अशी टीका राऊतांनी केली होती. ही टीका झोंबल्याने पालकमंत्री देसाईंनी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या नावे पत्रक काढून बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान न थांबविल्यास लोकनेत्यांचे कार्यकर्ते तुमच्या तोंडात शेण घालतील, असा इशारा संजय राऊतांना दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत? - लोकनेते बाळासाहेब देसाईंचे यांचे योगदान आम्ही विसरणार नाही. लोकनेत्यांनी काँग्रेसमध्ये असतानाही मराठी माणसांसाठी शिवसेनाप्रमुखांना आणि शिवसेनेच्या भुमिकेला पाठिंबा दिला. मात्र, त्यांच्या नातवाने शेण खाल्ल्याची खरमरीत टीका खा. संजय राऊत यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंवर केली. आजोबांना लोकनेते उपाधी का मिळाली, याचा अभ्यास त्यांच्या नातवाने करावा, असा सल्ला देत शंभूराजेंना अहंकार झाला आहे. ते पालक नव्हे मालकमंत्री झाले आहेत. येत्या निवडणुकीत पाटणची जनता भूकंप घडवेल. शंभूराज देसाईंचा पराभव होईल. तेव्हा जनतेने गाडलेला गद्दार बघायला मी नक्की येईल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला होता.

लोकनेत्यांचे कार्यकर्ते तोंडात शेण घालतील - संजय राऊतांची टीका झोंबल्याने शंभूराज देसाईंनी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या नावे पत्रक काढले. ज्या वाचाळवीराने ठाकरे सेना संपवली त्या संजय राऊतांची लोकनेते आणि त्यांच्या नातवावर बोलण्याची लायकी नाही. सातारा जिल्ह्यात येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान थांबवला नाही तर त्यांच्या तोंडात शेण घालण्याची धमक लोकनेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्षाच्या नावे काढलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

देसाई-ठाकरे घराण्यात तीन पिढ्यांचे ऋणानुबंध - बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेची स्थापना करत असताना पक्षीय भेद विसरून लोकनेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून ठाकरे-देसाई घराण्यात ऋणानुबंध आहेत. कोणाच्या भुंकण्याने हे ऋणानुबंध संपणार नाहीत, असे स्पष्ट करून संजय राऊतांनी सातारा जिल्ह्यात येताना तोंडाला लगाम लावावा. अन्यथा जनता तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शंभूराज देसाईंनी पत्रकाद्वारे दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.