सातारा - जिल्ह्यात मागील 24 तासात 1 हजार 90 बाधितांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 992 जणांचा मृत्यू झाला असून 8 हजार 706 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
मृतांमध्ये वडूज (ता. खटाव) येथील 16 वर्षीय महिला, रानमळा (ता. पाटण) येथील 60 वर्षीय पुरुष, करंजे (ता. सातारा) येथील 69 वर्षी पुरुष, सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 65 वर्षीय महिला, बोरगाव (ता. सातारा) येथील 45 वर्षीय पुरुष, रेणावळे (ता. सातारा) येथील 73 वर्षीय पुरुष,करंजे पेठेतील 46 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये (कळंबे ता. खटाव) येथील 65 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी (ता. कराड) येथील 43 वर्षीय महिला, सुपने (ता. कराड) येथील 61 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.