ETV Bharat / state

राज्यातील बळीराजावर अवकाळी संकट ! हातातोंडाशी‌ आलेला घास पावसाने हिरावला

author img

By

Published : Mar 10, 2020, 12:41 PM IST

राज्यातील बळीराजावर संकटामागून संकटे येताना दिसत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगाम अगदी जोमात होता. मात्र, पिके काढणीला आलेली असतानाच अवकाळी पाऊस बरसला आणि गहू, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले.

Satara District Unseasonal Rainfall
सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस

सातारा - जिल्ह्यातील कोरेगाव, कराड, पाटण, माण, खटाव, फलटण या भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा, विविध भाजीपाला पिकांसह आंबा व द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन तातडीने पंचनामे करावेत. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस... रब्बी पिकांचे मोठे नुकसान

हेही वाचा... अवकाळीचा फटका... रब्बीतील हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त

सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पावसाने पिकांना झोडपल्याने हातातोंडाशी‌ आलेल्या पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर द्राक्ष व आंब्याला आलेला मोहोर पावसामुळे गळून गेला असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा... जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

राज्यातील बळीराजावर संकटामागून संकटे येताना दिसत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगाम अगदी जोमात होता. मात्र, पिके काढणीला आलेली असतानाच अवकाळी पाऊस बरसला आणि गहू, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचे काही भागात पंचनामे करण्यात आले आहेत. राहिलेल्या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे तातडीने करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.