ETV Bharat / state

Satara Bank Robbery : साताऱ्यात बँक लुटण्याचा प्रयत्न फसला, भोंगा वाजल्याने चोरटे पळाले - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकच्या जयराम स्वामी वडगाव (ता. खटाव) येथील शाखेत शनिवारी मध्यरात्री चोरीचा धाडसी प्रयत्न ( satara district bank robbery attempt ) झाला. मात्र, बॅंकेतील भोंग्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.

Satara Bank Robbery
Satara Bank Robbery
author img

By

Published : Aug 7, 2022, 10:54 PM IST

सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकच्या जयराम स्वामी वडगाव (ता. खटाव) येथील शाखेत शनिवारी मध्यरात्री चोरीचा धाडसी प्रयत्न ( satara district bank robbery attempt )झाला. मात्र, बँकतील भोंग्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. बँकतील रोख रक्कम सुरक्षित राहिल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यावर सीसीटीव्ही कँमेरे बंद केले. त्यानतंर खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून बँकेचे शाखेत प्रवेश करत, तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेतील भोंग्यामुळे ग्रामस्थ जागे झाले. त्यांनी बँकेकडे धाव घेतल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.

तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जयराम स्वामी वडगाव शाखेने भोंगा बसवला आहे. चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करताच भोंगा वाजू लागला. तसेच, अधिकाऱ्यांना मेसेज गेल्यामुळे अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना सतर्क केले. ग्रामस्थ जागे झाल्याचा सुगावा लागताच चोरटे तिजोरी न फोडता पसार झाले.

हेही वाचा - Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.