सातारा Satara Accident News : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गावर बुधवारी रात्री आयशर टेम्पोने मालट्रकला (Tempo and Truck Accident) पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मंजुनाथ यल्लाप्पा कावली, आंनद गुरुसिद्ध गंगाई (दोघे रा. पामल दिनी, ता. गोकाक, जि. बेळगाव), नायकप्पा सत्यप्पा नायकर (रा. उज्जनकोप, ता. रामदुर्ग, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
आयशर टेम्पोचा चक्काचूर : मंगळुरूहून मुंबईकडे निघालेल्या मालट्रकचा टायर फुटल्याने ट्रक महामार्गाच्या कडेला मोटे वस्तीसमोर उभा होता. टायर बदलल्यानंतर चालकाने ट्रक सुरू करून मार्गस्थ होत असतानाच आयशर टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघतातात टेम्पोतील तिघांचा जागीच मृत्यू (Three People Died) झाला. अपघात एवढा भीषण होता की, मालट्रकमध्ये घुसल्यामुळे आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला. पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीमने क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने टेम्पो बाजूला काढला.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत : टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघातानंतर (Tempo and Truck Accident) पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिरवळ रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केलं. त्यानंतर क्रेन आणि जेसीबी आणून मालट्रकमध्ये घुसलेला टेम्पो बाजूला काढण्यात आला.
चालक, मालकासह क्लिनरचा मृत्यू : कर्नाटकातून पुण्याकडे निघालेल्या आयशरमध्ये स्वत: मालकासह अन्य एक चालक आणि क्लिनर असे तिघेजण होते. अपघातावेळी स्वत: मालकच टेम्पो चालवत होता, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या भरधाव आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्यानं आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. अपघातातील मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. सकाळी मृताचे कुटुंबीय शिरवळमध्ये दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा -