ETV Bharat / state

माऊलींच्या पालखीचे साताऱ्यात उत्साहात आगमन ; टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमला परिसर

author img

By

Published : Jul 2, 2019, 8:36 PM IST

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले.

टाळ-मृदूंगाच्या गजरात माऊलीेच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.

सातारा - टाळ मृदुंगाच्या गजरात आणि मोठ्या आनंदाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पाडेगाव येथे आगमन झाले. आज दुपारी 2 च्या सुमारास हरिनामाच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात ही पालखी येथे पोहोचली. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी व स्थानिक मंडळी माऊलींचा पालखी सोहळ्यातील भक्तीरसात चिंब होऊन गेले.

माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात उत्साहात आगमन

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले. यावेळी आण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रांताधिकारी संगीता चौगुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदींसह विविध पदाधिकारी, मान्यवर पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

नीरा नदीतील स्नानानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते.

आज माऊलींची पालखी लोणंद येथे मुक्कामी असणार आहे. उद्या चांदोबाचे उभा रिंगण सोहळा पार पडणार आहे. तर जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे मुक्काम होणार आहे.

Intro:सातारा:- संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज दुपारी 2 च्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.  फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि  हरिभजनात तल्लीन होऊन संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.Body:संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रांतांधिकारी संगीता चौगुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे  आदींसह विविध पदाधिकारी,  मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले.

नीरा नदीतील स्नानानंतर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी  तसेच लाखो भाविकांनी  दर्शन घेतले. माऊलीच्या  दर्शनासाठी भाविकांनी  एकच गर्दी केली होती.  हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते.  विविध विभागांच्या सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते. 

आज पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी असून उद्या चांदोबाचे उभा रिंगण सोहळा पार पडणार आहे. तर जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे मुक्काम होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.