ETV Bharat / state

Desai Comment On Raut: संजय राऊतांनी आपल्या चुकांचे खापर राजकीय पक्षावर फोडू नये -शंभूराज देसाई

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत लढाईला निघाल्यासारखे भासवत होते. एका गैरव्यवहार प्रकरणी आपल्याला ताब्यात घेतल्याचे ते विसरले होते. हात हालवत नौटंकी करत होते. ( Desai Comment On Raut ) उसने अवसान आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हेकेखोरपणामुळे शिवसेनेवर काय वेळ आली हे महाराष्ट्राने पाहिले आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली आहे.

माजी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई
माजी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई
author img

By

Published : Aug 2, 2022, 8:00 PM IST

सातारा - ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत लढाईला निघाल्यासारखे भासवत होते. एका गैरव्यवहार प्रकरणी आपल्याला ताब्यात घेतल्याचे ते विसरले होते. हात हालवत नौटंकी करत होते. उसने अवसान आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हेकेखोरपणामुळे शिवसेनेवर काय वेळ आली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. ( Shambhuraje Desai criticism of Raut ) राऊत यांनी आपल्या बोलण्यातून शिवसेना संपवण्याचे काम चोखपणे बजावले आहे. शिवसेना सोडणार नाही, असे ते म्हणत आहेत. पण, त्यांना कोण शिवसेना सोडा म्हणतय, असा थेट प्रश्न शंभूराजे देसाई यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

स्वायत्त यंत्रणा असल्याने ईडीला कारवाईचे स्वतंत्र अधिकार - पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे आमदार शंभूराज देसाईंनी समर्थन केले आहे. ईडी ही स्वायत्त यंत्रणा असून कारवाईचे स्वतंत्र अधिकार आहेत. ईडीसारख्या यंत्रणांच्या कारवाईमध्ये राजकीय पक्षाचा अथवा सरकारचा हस्तक्षेप नसतो. संजय राऊतांवरील आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मात्र, त्याचे खापर ते एखाद्या राजकीय पक्षावर फोडत आहेत. ही बाब चुकीची असल्याचे मत शंभूराज देसाईंनी व्यक्त केले आहे.

तसेच, आपल्या चुकीच्या गोष्टी बाहेर आल्या म्हणून त्याचे खापर संजय राऊतांनी एखाद्या राजकीय पक्षावर फोडणे चुकीचे आहे. काहीतरी चुकीचे काम केले आहे म्हणून आपल्यावर कारवाई झाली आहे. ते सोडून त्याचे खापर एखाद्या राजकीय पक्षावर फोडत असल्याची प्रतिक्रिया माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा - Sexting : धक्कादायक: मोबाईलवरुन 'सेक्सटिंग'च्या प्रमाणात वाढ, अशी ठेवा मुलांवर नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.