सातारा - 'स्व. बाळासाहेब ठाकरे एसटी अपघात वीमा योजना' राज्य शासनाने सुरु केली. या योजनेवरती माजी खासदार नाना पटोले यांनी टीका करताना मातोश्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दिवाकर रावते यांच्यावर आरोप केले आहेत.
यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजबळ यांना निवेदन देत पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवावा यासाठी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. तसेच तालुकाभर निदर्शनेही करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख बाळासो मुलाणी, शहरप्रमुख राहुल मंगरुळे, विभागप्रमुख अंबादास शिंदे, शिवदास केवटे, अमित कुलकर्णी, उप शहरप्रमुख आनंदा बाबर, आदित्य सराटे आदी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होत.
यावेळी भोसले म्हणाले की, बाळासाहेबांच्या नावाने मंत्री दिवाकर रावते यांनी काढलेली योजना ही प्रवाशांना दिलासा देणारी व फार मदतीची ठरली आहे. गेली ६५ वर्षे एसटीचा अपघात झाल्यास नानांच्या पक्षाचे सरकार जेमतेम एखादा लाखभर मदत करायचे. मात्र, बाळासाहेब ठाकरे अपघात वीमा रावते यांनी सुरू करून १० लाखांपर्यंत मदत देतानाच जखमींना व मृतांचे नातेवाईकांना तातडीची सेवा पुरवण्याचे फार मोठे कार्य केले आहे.
अशातच सरड्यासारखे रंग बदलावेत असे पक्ष बदलणारे नाना पटोले यांनी राजकीय वैफल्यातून केलेली ही बिनबुडाची वक्तव्ये आहेत. नाना सातार्यात यात्रा घेऊन याच, तुमचाही शिवसैनिक पर्दापाश करण्यास सज्ज असतील, असे भोसले म्हणाले.