ETV Bharat / state

Satara Crime : दरोडा टाकण्याच्या तयारीत होते; सातारा एलसीबी पथकाने आवळल्या मुसक्या - सातारा एलसीबी कारवाई

साताऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कराडमध्ये मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला रंगेहात अटक केली. आरोपींकडून मिरची पुड, धारदार कोयते, देशी बनावटीची १४ पिस्तुले आणि २२ काडतुसे असा एकूण ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Robbers Gang Arrested In Satara
दरोडेखोरांना अटक
author img

By

Published : Mar 28, 2023, 7:49 PM IST

दरोखोरांना करण्यात आलेल्या अटकेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

सातारा: एलसीबीची मागील सहा महिन्यांतील ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी, ता. कराड), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कराड), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हाऊसिंग सोसा.), धनंजय वाटकर (सैदापूर परिसर, ता. कराड), वाहीद बाबासो मुल्ला (रा. विंग, कराड तालुका), रिजवान रज्जाक नदाफ, हर्ष चंदवाणी (राहणार मलकापूर शहर), चेतन देवकुळे, बजरंग माने (राहणार बुधवार पेठ, कराड शहर) आणि तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची, कराड तालुका) अशा दहा संशयित लोकांना पोलिसांकडून अटक झाली आहे. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई: पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेची पथके कराड शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवित होती. कराड-विटा मार्गावर काही तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली. यावरून एलसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि दहा जणांच्या टोळीला शस्त्रांसह रंगेहात पकडले.

पळून जाण्याच्या तयारीत होते; पण.. : मौजे राजमाची (ता कराड) हद्दीत जानाई-मळाई मंदिराजवळ ऊसाच्या आडोशाला संशयित उभे होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. पोलीस झडतीत संशयितांकडून २२ जिवंत काडतुसे, १४ देशी बनावटीच्या पिस्टल, मिरची पूड आणि कोयता जप्त करण्यात आला. हे बघता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

'या' अधिकारी, कर्मचाऱ्यांची कारवाई: परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, पीआय बी. आर. पाटील, अरुण देवकर, सपोनि रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, गुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, नीलेश काटकर, मोहन पवार, प्रविण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन गणेश ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, वैभव सावंत, सचिन कापरे, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, नितीन येळवे, कुलदीप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: Increase Theft Incidents : मुंबईत चोरीच्या घटनांत वाढ; उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाताना काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.