ETV Bharat / state

ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने यंत्रणेला जाग; १२ तासांत रस्त्याचे काम सुरू - satara rain update

सातारा तालुक्यातील रेवंडे गावाजवळ गेल्या शनिवारी अवकाळी पावसात डोंगराचा कडा ढासळला होता. या दुर्घटमुळे रेवंडे गावचा रस्ता बंद झाला होता. ग्रामस्थांना दूरच्या कच्च्या रस्त्याने सुमारे ४० किलोमिटरचा फेरा मारून साताऱ्याला यावे लागत होते. दुर्घटनेनंतर चार दिवस उलटले तरी शासकीय यंत्रणा ढिम्म होती.

Road work underway
रस्त्याचे काम सुरू
author img

By

Published : Oct 23, 2020, 8:29 AM IST

सातारा- 'रेवंडे गावाजवळ कोसळला अडचणींचा 'डोंगर'; प्रशासन अद्याप कुंभकर्णीय निद्रेत' या 'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणेने रेवंडे गावाकडे धाव घेतली. महसूल विभागाने नुकसानीची पाहणी केली तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक यंत्रणा घटनास्थळी पोहचवून दगड हलवण्याच्या कामाला सुरुवात केली.

१२ तासांत रस्त्याचे काम सुरू

सातारा तालुक्यातील रेवंडे गावाजवळ गेल्या शनिवारी अवकाळी पावसात डोंगराचा कडा ढासळला होता. या दुर्घटमुळे रेवंडे गावचा रस्ता बंद झाला होता. ग्रामस्थांना दूरच्या कच्च्या रस्त्याने सुमारे ४० किलोमिटरचा फेरा मारून साताऱ्याला यावे लागत होते. दुर्घटनेनंतर चार दिवस उलटले तरी शासकीय यंत्रणा ढिम्म होती. 'ईटीव्ही भारत'ने या विषयावर आवाज उठवत कुंभकर्णीय झोपेत असलेले जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी कधी जागे होणार?, असा सवाल केला होता.

हेही वाचा-सातारा : रेवंडे गावाजवळ कोसळला अडचणींचा 'डोंगर'; प्रशासन अद्याप कुंभकर्णीय निद्रेत

रात्री ९ वाजता ईटीव्ही भारतच्या पोर्टलवर वृत्त प्रसिद्ध झाले. उच्चस्तरावरुन प्रशासकीय सुत्रे फिरली आणि सकाळी ९ वाजता प्रतिनिधींना फोन आला. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा तासाभरात घटनास्थळी पोहचवून रस्त्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जेसीबी, पोकलॅन मशिन, डंपर्स व आवश्यक यंत्रणा जागेवर पोहचून कामाला सुरुवात झाली.

परळी विभागाचे सर्कल व तलाठी यांनी दुपारी दुर्घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.टी. अहिरे, शाखा अभियंता रवी आंबेकर यांच्या निगराणीखाली काम सुरु झाले आहे. कड्याचा ढासळलेला भाग मोठा असल्याने सुरुंगाच्या सहाय्याने दगड फोडून रस्ता मोकळा करुन देण्यात येईल. त्यानंतर उर्वरीत आवश्यक कामे करण्यात येतील. जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना घडल्यास कमीतकमी हानी होईल, याची आम्हीं काळजी घेऊ, असेही अहिरे यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांनी दिले 'ईटीव्ही भारत'ला धन्यवाद

'ईटीव्ही भारत'ने आवाज उठवला आणी अवघ्या १२ तासांत यंत्रणा हालली. या बद्दल रेवंडे गावचे माजी पोलिस पाटील जयसिंग भोसले व उपस्थित ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.