ETV Bharat / state

कासच्या जंगलात पालिकेचे वृक्षारोपण नावालाच, 90 टक्के रोपांच्या उरल्या काटक्या, रेन ट्री लावण्याचाही पराक्रम

कास तलावाच्या दोन्ही तीरावर उच्चतम पाणी पातळीच्या बाहेर हे वृक्षारोपण करण्यात आले. जलसंपदा विभागाच्या संबंधित खात्याने दहा मजूर लावून दहा दिवसात हे काम केल्याचे सांगण्यात येते; जे अशक्य कोटीतील आहे. तीन वर्षांपूर्वी कास बंगल्याच्या पिछाडीला लावलेल्या झाडांच्या अक्षरशः काटक्या पाहायला मिळाल्या. लावलेल्या रोपांपैकी 90 टक्के मृत्यू दिसून आले.

कासच्या जंगलात पालिकेचे वृक्षारोपण नावालाच

author img

By

Published : Aug 11, 2021, 7:57 AM IST

Updated : Aug 11, 2021, 4:56 PM IST

सातारा -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या क्षमता वाढीच्या कामात पर्यावरणीय समतोल कायम राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. कास तलाव क्षमता वाढीच्या कामात तोडाव्या लागलेल्या झाडांच्या बदल्यात जलसंपदा विभागाने झाडे लावली, खरी पण आज तीन वर्षांनंतर त्या झाडांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कासच्या खुरट्या जंगलात रेन ट्री सारख्या 'डॉमिनेटिंग' प्रजाती लावण्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. या सर्व परिस्थितीचा 'ईटीव्ही भारत'चे जिल्हा प्रतिनिधी शैलेन्द्र पाटील आढावा घेतला आहे. यासाठी सॅम्पल सर्व्हे करण्यात आला त्या रियालिटी चेकचा हा ग्राउंड रिपोर्ट ...

कासच्या जंगलात पालिकेचे वृक्षारोपण नावालाच
सहा हजार वृक्षलागवडीचा दावा
सातारा पालिकेने 2018 मध्ये कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू केले होते. या कामासाठी तलावा लगतची काही खासगी तसेच वन जमीन संपादित करावी लागली. या जागेतील सुमारे साडेतीन हजार झाडे तोडावी लागली. तसेच वन विभागाचे भोपाळ मुख्यालय आणि हरित लवादाची विशेष परवानगी पालिकेला घ्यावी लागली होती. काम सुरू करताना कराव्या लागलेल्या वृक्षतोडीच्या बदल्यात 2018 व 2019 या दोन वर्षांत सुमारे सहा हजार झाडांचे रोपण केल्याचा दावा पालिकेच्या वतीने जलसंपदा संपदा विभागाने केला आहे.

काय आहे जागेवरील स्थिती
कास तलावाच्या दोन्ही तीरावर उच्चतम पाणी पातळीच्या बाहेर हे वृक्षारोपण करण्यात आले. जलसंपदा विभागाच्या संबंधित खात्याने दहा मजूर लावून दहा दिवसात हे काम केल्याचे सांगण्यात येते; जे अशक्य कोटीतील आहे. तीन वर्षांपूर्वी कास बंगल्याच्या पिछाडीला लावलेल्या झाडांच्या अक्षरशः काटक्या पाहायला मिळाल्या. लावलेल्या रोपांपैकी 90 टक्के मृत्यू दिसून आले.

कासच्या जंगलात रेन ट्री
मुळात जलसंपदा विभागाने स्वतः ही झाडे न लावता, त्याची जबाबदारी एका अनुकंपा तत्त्वावरील कामगारावर सोपवली. त्यातही त्याला देण्यात आलेल्या झाडांमध्ये काही स्थानिक प्रजातींच्या रोपांबरोबरच निलगिरी, साग आणि चक्क रेन ट्री च्या रोपांचाही समावेश होता. कास तलावाच्या काठावर, कास बंगल्याच्या मागील बाजूस रेन ट्री, काॅपर पाॅड या प्रजातीची रोपे लावल्याचे आढळून आले. रेन ट्री ची 300 रोपं लावल्याचे सांगण्यात आले. फणस, जांभूळ, हिरडा, बेहडा आदी स्थानिक प्रजाती लावण्या ऐवजी इतर झाडाझुडुपांना वाढू न देणाऱ्या (डॉमिनेटिंग) विदेशी प्रजातीची रोपे लावण्यावर पर्यावरण प्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवला. कासच्या निसर्गाशी या प्रजाती एकरूप होऊ शकणार नाहीत. उलट कासच्या जंगलाच्या विनाशाला रेन ट्री कारणीभूत ठरेल, असा धोक्याचा इशारा साताऱ्यातील वनस्पती अभ्यासक दिलीप भोजने यांनी दिला.
लवादाच्या निर्देशांचे उल्लंघन
कासमध्ये पालिकेने सहा हजार झाडे लावली असतील, असे आमच्या पाहणीत दिसून आले नसल्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले, "तलाव परिसरात मोजकी झाडे लावलेली दिसतात; तिही परदेशी प्रजातीची आहेत. लावलेल्या रोपांची निगा राखली न गेल्याने यातील बहुतांश रोपे मेली, तर जी शिल्लक आहेत ती अस्तित्वासाठी झगडत आहेत. कासला पालिकेने उभा केलेला वृक्षारोपणाचा देखावा हे लवादाच्या निर्देशांचे उल्लंघन आहे, असे सुनील भोईटे यांनी स्पष्ट केले.
हरित लवादाकडे दाद मागू
कासच्या वृक्षारोपणाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन तिरोडकर यांनी पुण्याच्या हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशारा 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला. ते म्हणाले, "कासला तोडीच्या प्रमाणात रोप लागवड केल्याचे दिसत नाही. जी रोपे लावली गेली त्याच्या आता केवळ काटक्या शिल्लक आहेत. अशा पद्धतीने निसर्गाशी खेळ केला जाणार असेल तर आम्हाला नाईलाजाने लवादापुढे जावे लागेल."

Last Updated : Aug 11, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.