ETV Bharat / state

MLA Ramraje Vs MP Ranjitsinh : आमदार, खासदारांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे फलटणचे राजकारण तापले - Artifacts of creditism from developmental works

फलटण तालुक्यात आमदार रामराजे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात राजकीय द्वंद सुरू झाले आहे. विकासकामांवरून श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याने फलटणचे राजकारण भलतेच तापले आहे.

MLA Ramraje Vs MP Ranjitsinh
MLA Ramraje Vs MP Ranjitsinh
author img

By

Published : Feb 25, 2023, 7:22 PM IST

सातारा : फलटण तालुक्यात आमदार रामराजे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात राजकीय द्वंद सुरू झाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून विकासकामांवरून श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याने फलटणचे राजकारण भलतेच तापले आहे. दिल्ली मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये सत्तांतर होईल, अशी स्वप्ने बघू नका, असा टोला रामराजेंनी लगावला, तर आपण वेगाने विकासकामे केल्याने रामराजेंना धक्का बसला असल्याची उपरोधिक टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी केली आहे.

फलटणमध्ये श्रीरामाचेच राज्य राहणार : दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघू नयेत. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत इथे सत्तांतर अशक्य आहे. कोणी कितीही नेते आणुद्यात. इथे राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार. बाकी कुणाचे चालणार नाही, असा टोला आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना लगावला. खासदारकीच्या माध्यमातून फलटण शहर आणि तालुक्याचे सोने करायची त्यांना संधी होती. मात्र, बोलण्यापलिकडे त्यांनी काही केले नाही, करुही शकत नाहीत. निवडणूका जवळ आल्या असून त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे अशी खरमरीत टीका देखील रामराजेंनी केली.

आयत्या पिठावर रेघोट्या : विरोधकांमध्ये क्षमता नाही. माढा लोकसभा मतदारसंघात खासदारांबद्दल लोक काय बोलतात हे आपणास चांगले माहिती आहे. दांडगी हौस, राक्षसी महात्वकांक्षा तसेच काम करण्याची ताकद आणि इच्छा नसणार्‍यांसोबत जाऊन जनतेला चालणार नाही. नीरा-देवघर प्रकल्पाचे मीच भूमीपूजन केले, टेंडर काढले, 66 किलोमीटर पाणी आणले. आता कालवे काढायला जमिनीच्या किंमती वाढल्याने पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. त्याचे टेंडरही झाले असेल. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील असतानाच हा निर्णय झाला आहे. कष्ट माझे आणि आयत्या पिठावर ते रेघोट्या मारत आहेत, अशी टीका रामराजेंनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा नामोल्लेख टाळून केली.

विकासकामांमुळे रामराजेंना धक्का : आपण ज्या वेगाने विकासकामे करीत आहोत, त्याचा आमदार रामराजेंना जोराचा धक्का बसला आहे. त्यातून ते सावरावेत, असा पलटवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी सातार्‍याती पत्रकार परिषदेत बोलताना केला. आपण नीरा-देवघर, रेल्वेसह अन्य सर्व विकासकामांचे श्रेय रामराजे यांना देत आहे, असा उपरोधिक टोला मारून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत. त्यामुळे श्रेयवादात पडू इच्छित नाही.

कर्तृत्वान असणारा तांत्रिक मुद्दे वाढवित नाही : खासदारांना घटनेतील 372 कलम रद्द करता येईल, या रामराजेंच्या टीकेला उत्तर देताना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की, जो कर्तृत्ववान असतो तो तांत्रिक मुद्दे वाढवीत नाही. दुष्काळी जनतेच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या नीरा-देवघर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन काय हवे आहे का, अशी विचारणा केली होती. त्यावर आपण त्यांच्याकडे सोळशी प्रकल्पाची मागणी केली आहे. प्रकल्पातील पाण्यामुळे फलटण तालुक्यातील धोम-बलकवडीचे कालवे बारमाही वाहतील.

हेही वाचा - Congress Session Raipur : प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी 6 हजार किलो फुलांची नासाडी; बहारो फुल बरसाओ प्रियंका आयी है....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.