ETV Bharat / state

फलटणच्या 'त्या' किळसवाण्या प्रकारातील मनोरुग्ण वाईच्या यशोधन निवारा केंद्रात - mental man eat dead body

फलटण येथे कोविड मृतदेहाचे अर्धवट जळालेले मांस खाणाऱ्या मनोरुग्णाला वाईजवळच्या यशोधन निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे पालकत्व संस्थेने स्वीकारले असून त्याच्यावर उपचार सुरु करून त्याच्या कुटुंबियांचाही शोध घेण्यात येईल, असे यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांनी सांगितले.

psychiatric patient who eats dead body
psychiatric patient who eats dead body
author img

By

Published : Apr 30, 2021, 10:16 PM IST

Updated : Apr 30, 2021, 10:24 PM IST

सातारा - फलटण येथे कोविड मृतदेहाचे अर्धवट जळालेले मांस खाणाऱ्या मनोरुग्णाला वाईजवळच्या यशोधन निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे पालकत्व संस्थेने स्वीकारले असून त्याच्यावर उपचार सुरु करून त्याच्या कुटुंबियांचाही शोध घेण्यात येईल, असे यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांनी सांगितले.

फलटणजवळ कोळकी ग्रामपंचायतीची स्मशानभूमी पालिकेने अधिग्रहीत केली आहे. त्याठिकाणी तालुक्यातील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. दोन दिवसांपूर्वी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका चितेजवळ बसून हा तरुण चितेतून काही तरी काढून त्याचे तुकडे करुन खात असल्याचे निदर्शनास आले. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने फलटणसह जिल्ह्यात या प्रकाराची मोठी चर्चा सुरू होती. नगरपालिकेला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पथकाने जिंती नाक्यावर संबंधित तरुणाला ताब्यात घेतले होते.

तो मनोरुग्ण वाईच्या यशोधन निवारा केंद्रात
तो तरुण हैदराबादचा -प्राथमिक चौकशीत तो हैदराबादचा रहिवासी असल्याचे दिसते. अशा मनोरुग्णाला कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्या रुग्णाची वेळे (ता. वाई ) यशोधन निवारा केंद्रात सोय करण्यात आली आहे. ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके म्हणाले, "या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहोत. त्याच्यावर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. त्याचबरोबर त्याचे घर शोधून त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

Last Updated : Apr 30, 2021, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.