ETV Bharat / state

पाटणसाठी 107 कोटी 67 लाखांची तरतूद; प्रशासकीय इमारत, पोलीस प्रशिक्षण केंद्रही मंजूर

author img

By

Published : Mar 10, 2021, 3:34 AM IST

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पाटण मतदार संघातील विकासकामांसाठी 107 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. पाटणमध्ये नवीन प्रशासकीय इमारत आणि कोयनानगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रालाही त्यांनी मंजुरी मिळविली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प त्यांनी विधान परिषदेत सादर केला.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड (सातारा) - अर्थ राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पाटण मतदार संघातील विकासकामांसाठी 107 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. पाटणमध्ये नवीन प्रशासकीय इमारत आणि कोयनानगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रालाही त्यांनी मंजुरी मिळविली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प विधान परिषदेत सादर झाला.

महत्वाच्या रस्त्यांना राज्यमार्गाचा दर्जा-

पाटण तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांना राज्यमार्गाचा दर्जा त्यांनी मिळविला आहे. अशा मोठ्या रस्त्यांच्या आणि पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लाख, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 11 कोटी 87 लाख, पाटण न्यायालयाच्या अतिरिक्त बांधकामासाठी 1 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनाने मंजुरी दिल्याने पाटण तालुक्याच्या प्रशासकीय वैभवात भर पडणार असल्याचा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

अर्थसंकल्पात निधी मंजूर-

नवजा-हेळवाक-गोवारे-मोरगिरी-गारवडे-साजूर-विंग-वाठार या पाटण आणि कराड तालुक्यासह पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणार्‍या रस्त्याच्या सुधारणेसाठी 3 कोटी, नाडे-सांगवड-मंद्रुळकोळे-ढेबेवाडी मार्गावरील कोयना नदीवर उंच पुलाच्या कामासाठी 18, चरेगाव-चाफळ-डेरवण-दाढोली-चोपडी-नाटोशी या जिल्हा मार्गावरील त्रिपुडी येथे कोयना नदीवर पुलाच्या कामासाठी 20 कोटी रूपयांच्या निधीच्या तरतुदीचा एकूण निधीच्या रकमेत समावेश आहे. पाटण तालुक्यातील एकूण सर्व महत्वाच्या कामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर झाला असल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे.

प्रशिक्षण केंद्र, प्रशासकीय इमारतीमुळे वैभवात भर-

निर्सगाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या पाटण तालुक्यातील कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ना. शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली आहे. तसेच पाटण शहरात नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी भरीव निधीची तरतूद झाल्यामुळे पाटण तालुक्याच्या वैभवात भर पडणार असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- Maha Budget session : विधानसभेतील दिवसाभराचे कामकाज.. विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.