ETV Bharat / state

Pratapgarh Open For Tourist : अखेर प्रतापगड पर्यटकांसाठी खुला, अफजलखान कबर परिसरात बंदोबस्त कायम - Encroachments Afzal Khan Grave Removed

अखेर आठ दिवसांनंतर गुरूवारी प्रतापगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला ( Pratapgarh Open For Tourists ) आहे. मात्र, कबरीच्या परिसरातील बंदोबस्त कायम ठेवण्यात आला ( Police Force Near Afzal Khan Tomb ) आहे.

Pratapgarh
प्रतापगड
author img

By

Published : Nov 17, 2022, 4:28 PM IST

सातारा : अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे मागील आठवड्यात हटविण्यात आली. तेव्हापासून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. अखेर आठ दिवसांनंतर गुरूवारी प्रतापगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला ( Pratapgad Open For Tourists ) आहे. मात्र, कबरीच्या परिसरातील बंदोबस्त कायम ठेवण्यात आला ( Police Force Near Afzal Khan Tomb ) आहे.

प्रतापगड पर्यटकांसाठी खुला : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे मागील आठवड्यात हटविण्यात ( Encroachments Afzal Khan Grave Removed ) आली. तेव्हापासून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. अखेर आठ दिवसांनंतर गुरूवारी प्रतापगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, कबरीच्या परिसरातील बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. प्रतापगड पर्यटकांसाठी खुला झाल्याने आता प्रतापगडावर पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी वाढणार असून स्थानिकांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागणार आहे.

आठ दिवस पर्यटकांसाठी प्रतापगड होता बंद : अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रतापगडाच्या आजुबाजूचा परिसर प्रशासनाने सील केला होता. प्रतापगडावर कोणालाही सोडले जात नव्हते. अतिक्रमण हटविल्यानंतर मलबा उचलण्याचे काम जवळपास 5 दिवस सुरू होते. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतापगड परिसरात 144 कलम लागू केले होते. तसेच पर्यटकांना बंदी घातली होती.

पर्यटकांची गर्दी वाढणार : अफजलखान परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर प्रतापगड आणि कबरीचा परिसर पाहण्यासाठी पर्यटक, शिवप्रेमींची आता गर्दी वाढणार आहे. मात्र, कबरीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आल्याने पर्यटक अथवा शिवप्रेमींना तिकडे फिरकू दिले जाणार नाही. दरम्यान, प्रतापगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने गेली आठ दिवस स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता प्रतपागड खुला झाल्याने त्यांच्या रोजंदारीचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.