ETV Bharat / state

मेडिकलमध्ये शीतपेय विकणे पडू शकते महागात, कारवाईचा इशारा - medical shop

आईस्क्रिम, कोल्ड्रींक्ससारख्या शीतपेयांची विक्री करणाऱ्या मेडिकल्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार कारवाई केली जाणार आहे.

author img

By

Published : Mar 30, 2020, 12:40 PM IST

सातारा - वाढत्या तापमानामुळे काही औषध दुकानदार कोल्ड्रींक्स विक्री करत आहेत. शीतपेय जीवनावश्यक वस्तुंमध्ये मोडत नाही. त्यामुळे, गर्दी टाळण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मेडीकल्समध्ये शीतपेयांवर विक्री करण्यास बंदीचे आदेश जारी केले आहेत.

आईस्क्रिम, कोल्ड्रींक्ससारख्या शीतपेयांची विक्री करणाऱ्या मेडिकल्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेतीसाठी आवश्यक असलेली खते, औषधे बी-बियाणे विक्री करणारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व कृषी सेवा केंद्र चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हास्तरीय उद्योग समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्ह्यातील २८ कंपन्या एकमेकांशी निगडीत उत्पादन साखळीमध्ये येत असल्यामुळे हे उद्योग सुरु राहणार आहे. त्यांच्या आस्थापनावरील कर्मचारी व अधिकारी तसेच कच्चा माल आणि पक्का माल वाहतूक करण्यासाठी वाहनांना परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.