सातारा - माण तालुक्यातील कुकुडवाडमधील चुलत्याच्या खुनातील संशयित आरोपी संदिप उर्फ पप्या यास म्हसवड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
या बाबतची माहिती अशी, संदिप चव्हाण याने रात्री उशिरा चुलते लक्ष्मण आण्णा चव्हाण हे बाहेर झोपलेले असल्याचा फायदा घेऊन गळ्यावर दोन्ही बाजूला धारधार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली होती. चुलत्याचा रात्री खून करून वडजलच्या डोंगर, दऱ्यांमध्ये पहाटे थांबून सकाळी 11 वाजता नरवणेच्या दिशेने दहिवडीकडे जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान, संशयित आरोपी संदिप उर्फ पप्या वसंत चव्हाण याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.