ETV Bharat / state

Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंच्या घरासमोरील इमारतीवर उदयनराजेंचे चित्र काढण्यावरून तणाव, चित्रकार पोलिसांच्या ताब्यात

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराशेजारील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे काढले जाणारे चित्र हे या तणावाचे कारण बनले. पोलिसांनी चित्रकारासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून पोवई नाका परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Shambhuraj Desai
चित्रकाराला ताब्यात घेताना पोलिस अधिकारी
author img

By

Published : Mar 7, 2023, 7:35 PM IST

चित्रकाराला ताब्यात घेताना पोलिस कर्मचारी

सातारा : ऐन धुळवडीच्या सणादिवशीच सातार्‍यातील पोवई नाक्यावर तणाव निर्माण झाला. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराशेजारील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे काढले जाणारे चित्र हे या तणावाचे कारण बनले. इमारतीच्या भिंतीवर उंच ठिकाणी चित्र काढायचे होते. त्यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यास पालकमंत्र्यांच्या मुलाने हरकत घेतली होती. त्यानंतर काम बंद केले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा चित्र काढण्याचे काम सुरू होताच पोलिसांनी चित्रकाराला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला. सध्या पोवई नाका परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

तीन दिवसांपुर्वी चित्र काढण्याची तयारी : सातार्‍यातील राहुल पाटोळे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्या भिंतीवर मोठे चित्र रेखाटले आहे. त्याच धर्तीवर पोवई नाक्यावरील खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीच्या इमारतीच्या भिंतीवर त्यांनी उदयनराजेंचे चित्र काढण्याची तयारी सुरू केली होती.

पालकमंत्र्यांच्या मुलाची हरकत : पोवई नाक्यावरील मंत्री शंभूराज देसाईंच्या घराशेजारील इमारतीच्या भिंतीवर चित्र काढण्यात येणार होते. त्यासाठी क्रेनच्या साह्याने भिंत रंगविण्यात आली आणि शनिवारी छायाचित्र काढण्यास सुरूवात केली. परंतु, चित्र काढण्यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यात येत होती. त्याला पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेतली. शंभूराज देसाई आल्यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे यशराज यांनी संबंधितांना सांगितले.

कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटकले : या घटनेनंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना हटकण्यात आले. शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, संजय पतंगे हे पोवई नाक्यावर दाखल झाले. त्यांच्यासोबत मोठा फौजफाटा होता. या संपुर्ण प्रकाराची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना काही जणांनी दिली. त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आले. उदयनराजे समर्थकांवर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले.

पोलिसांचा बंदोबस्त वाढविला : या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे त्याठिकाणी येतील, अशी शक्यता गृहीत धरून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यानंतर चित्र रेखाटण्याचे काम थांबले होते. मात्र, पोलीस बंदोबस्त कायम होता. मंगळवारी सकाळी चित्र काढण्याचे काम पुन्हा सुरु झाले. छायाचित्राच्या मार्किंगचे थोडे काम झाल्यानंतर ते पुन्हा बंद करण्यात आले.

चित्रकाराला पोलिसांच्या ताब्यात : चित्र काढण्याचे काम थांबविण्यात आल्यानंतर पोवई नाका परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. इमारतीच्या भिंतीवर चित्र काढण्याचा मुद्दा गेल्या चार दिवसांपासून प्रतिष्ठेचा केला गेला आहे. मंगळवारी सकाळी चित्र काढण्यास सुरूवात होताच पोलिसांनी चित्रकारासह तेथे उपस्थित असणार्‍या काही जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे ऐन धुळवड सणादिवशी पोवई नाक्यावर दिवसभर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

शंभूराजेंचा सावध पवित्रा : घडलेल्या प्रकाराबद्दल मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मला या घटनेबद्दल काहीच माहिती नाही. मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. चित्र काढले जात असेल तर चांगलेच आहे. ते (उदयनराजे) आमचे मित्रच आहेत आणि शिवसेना-भाजप युती आहे. ते मागे राष्ट्रवादीत होते तेव्हाही आम्ही त्यांना मदत करत होतो. आता तर युती आहे, अशी सावध प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली.

हेही वाचा : Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पातून राज्याला काय? शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.