ETV Bharat / state

काँग्रेसने विकासाचे राजकारण करण्याऐवजी फक्त मतांचं राजकारण केलं- पंकजा मुंडे

संविधान बदलण्याचं मी कधीच म्हणाले नाही. हा माझ्याविषयी खोटा प्रचार करण्यात येत आहे. गरिबांना पडलेले सुंदर स्वप्न नरेंद्र मोदी आहेत, असे पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या.

काँग्रेसने फक्त मतांचं राजकारण केलं
author img

By

Published : Apr 21, 2019, 11:28 PM IST

सातारा- काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता भोगली. मात्र, विकासाचे राजकारण करण्याऐवजी त्यांनी फक्त मतांचे राजकारण केले. असा घणाघाती आरोप राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप महायुतीचे उमेदवार नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथील सभेत त्या बोलत होत्या.

काँग्रेसने फक्त मतांचं राजकारण केलं

पंकजा मुंडेंनी या वेळी भाजप सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. सर्जिकल स्ट्राईक करण्याच धाडस करत देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं आहे. देशातील अल्पसंख्याक मुस्लिम समाज आज सुरक्षित आहे. 450 कोटींची जलसंधारणाची कामं या भागात करण्यात आली आहे. 125 कोटी रस्त्यांसाठी दिले आहेत. अशी अनेक कामं या सरकारने केल्याच मुंडे यावेळी म्हणाल्या.

संविधान बदलण्याचा मी म्हटले नाही. हा माझ्याविषयी खोटा प्रचार करण्यात येत आहे. गरिबांना पडलेले सुंदर स्वप्न नरेंद्र मोदी आहेत, असे ही त्या वेळी म्हणाल्या.पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, मदनराव मोहिते पाटील, रासपचे मामूशेठ विरकर, शिवसेनेचे रणजित देशमुख यावेळी उपस्थित होते.

Intro:सातारा (माढा)सीमा सुरक्षित करणे प्रधानमंत्र्यांच्या काम आहे? सर्जिकल स्टाईल करण्याच काम देखील केलं आहे. देशातला अल्पसंख्याक मुस्लिम समाज सुरक्षित ठेवला आहे. जलसंधारणाची मोठे काम केले 450 कोटी जलसंधारणाला दिले. 125 कोटी रस्ते दिले. शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करून महान व्यक्तींचा सन्मान करण्याचे काम या सरकारने केले, काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता भोगली विकासाचे राजकारण करण्याऐवजी फक्त मतांचे राजकारण केले. असा घणाघाती आरोप महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, (आठवले गटाचे) उमेदवार नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथे त्या बोलत होत्या.

यावेळी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, मदनराव मोहिते पाटील, रासपचे मामूशेठ विरकर, शिवसेनेचे रणजित देशमुख उपस्थित होते.

Body:ॲट्रॉसिटी कायदा हे मागासवर्गीय समाजाची कवच कुंडले आहे… असे मी म्हणते त्यामुळे संविधान बदलणे हा माझ्याविषयी खोटा प्रचार आहे. गरिबांना पडलेले सुंदर स्वप्न नरेंद्र मोदी आहेत. स्वतःचा मतदार संघ राकता आला नाही, पाणी आणता आले नाही. आम्ही पाणी आणले, धनगर समाजाला न्याय दिला शिवाय स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दया पण ओबीसीला धक्का न लावता द्या अशी आमची भूमिका आहे.

(या यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर यांनी भाजपला पाठिंबा दिला)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.