ETV Bharat / state

कराडात आढळले खवल्या मांजर; तस्करीचा संशय

कराड शहरात तवर गल्लीत बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर पळताना दिसले. त्याला वन विभागाने ताब्यात घेऊन जंगलात सोडले आहे.

pangolin-found-in-karad-city
कराड शहरात आढळले खवल्या मांजर
author img

By

Published : Dec 19, 2019, 9:54 PM IST

सातारा - कराड शहरात तवर गल्लीत बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. वन विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. दुर्मिळ असलेले हे मांजर तस्करीसाठी आणले असावे, असा संशय बळावल्याने गुरुवारी सकाळी वन विभागाने रितू नावाच्या श्वानाकडून माग काढला असता श्वान त्याच परिसरात घुटमळले.

कराडमधील तवर गल्लीत रात्री साडे बाराच्या सुमारास एक विचित्र प्राणी रस्त्यावरून पळताना युवकांनी पाहिला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र अजय महाडिक व वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे यांना माहिती दिली. ते तातडीने तवर गल्लीत परीसरात दाखल झाले. तो प्राणी खवल्या मांजर आहे यांची ओळख त्यांनी पटवली. ते दुर्मिळ मांजर असून वन्यजीव अधिनियमान्वये या प्राण्याला शेड्युल एकमधील दर्जा आणि संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे भाटे यांनी खवल्या मांजरास ताब्यात घेतले. कराडात खवल्या मांजर आढळल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व सातारच्या उपवनसंरक्षकांना दिली.

कराडमधील वर्दळीच्या आणि रहिवासी भागात खवल्या मांजर आढळल्याने ते तस्करीसाठी आणले असावे, असा संशय आल्यामुळे 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो'चे सदस्य तथा वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांना संपर्क करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे असलेल्या ’रितू’या श्वानाची मदत मिळण्यासाठी विनंती केली. गुजर यांनी तत्काळ श्वानपथक कराडकडे रवाना केले. कराड शहरातील घटनास्थळी दाखल होताच त्याला खवल्या मांजराचा वास देण्यात आला. त्या वासाच्या दिशेने रितू श्वानाने 500 मीटरपर्यंत माग काढला. शेवटी एका घराच्या बोळात ते घुटमळले.

श्वान पथकासमवेत वनक्षेत्रपाल विलास काळे, वनरक्षक जाधवर, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य तथा वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे होते. कराडमध्ये आढळलेल्या खवल्या मांजराला जंगलात सोडण्यात आले. नागरिकांना मांजरासंदर्भात काही माहिती मिळाल्यास वन विभागाला कळवण्याचे आवाहन वन अधिकार्‍यांनी केले आहे.

Intro:कराडातील तवर गल्लीत बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. वन विभागाने त्याला ताब्यात घेतले असून दुर्मिळ असलेले हे मांजर तस्करीसाठी आणले असावे, असा संशय बळावल्याने गुरूवारी सकाळी वन विभागाने रितू नावाच्या श्वानाकडून माग काढला असता श्वान त्याच परिसरात घुटमळले. Body:
कराड (सातारा) -  कराडातील तवर गल्लीत बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. वन विभागाने त्याला ताब्यात घेतले असून दुर्मिळ असलेले हे मांजर तस्करीसाठी आणले असावे, असा संशय बळावल्याने गुरूवारी सकाळी वन विभागाने रितू नावाच्या श्वानाकडून माग काढला असता श्वान त्याच परिसरात घुटमळले.
   कराडमधील तवर गल्लीत रात्री साडे बाराच्या सुमारास एक विचित्र प्राणी रस्त्यावरून पळताना युवकांनी पाहिला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र अजय महाडिक व वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे यांना माहिती दिली. ते तातडीने तवर गल्लीत आले. तो प्राणी खवल्या मांजर होते. ते दुर्मिळ मांजर असून वन्यजीव अधिनियमान्वये या प्राण्याला शेड्युल एकमधील दर्जा आणि संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे भाटे यांनी खवल्या मांजरास ताब्यात घेतले. कराडात खवल्या मांजर आढळल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व सातारच्या उपवनसंरक्षकांना दिली. 
   कराडमधील वर्दळीच्या आणि रहिवासी भागात खवल्या मांजर आढळल्याने ते तस्करीसाठी आणले असावे, असा संशय आल्यामुळे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य तथा वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे  क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांना संपर्क करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे असलेल्या ’रितू’या श्वानाची मदत मिळण्यासाठी विनंती केली. गुजर यांनी तात्काळ श्वानपथक कराडकडे रवाना केले. कराडातील घटनास्थळी दाखल होताच त्याला खवल्या मांजराचा वास देण्यात आला. त्या वासाच्या दिशेने रितू श्वानाने 500 मीटरपर्यंत माग काढला. शेवटी एका घराच्या बोळात ते घुटमळले. 
   श्वान पथकासमवेत वनक्षेत्रपाल विलास काळे, वनरक्षक जाधवर, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य तथा वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे होते. कराडमध्ये आढळलेल्या खवल्या मांजराला जंगलात सोडण्यात आले. नागरीकांना मांजरा संदर्भात काही माहिती मिळाल्यास वन विभागास कळविण्याचे आवाहन वन अधिकार्‍यांनी केले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.