सातारा - 60 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तो 16 अनुमानित विलगीकरण कक्षात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिलीय. ही व्यक्ती मुंबईत खासगी ठिकाणी काम करत होती. गावी आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काल जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या १४ निकटवर्तीयांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू-संसर्गामुळे दोन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या 16 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालयात तीव्र जंतू-संसर्गामुळे दाखल झालेला 25 वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री एकच्या सुमारास त्याला कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.