ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा पहिला बळी, मरळीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - मरळी

मरळी (ता. पाटण) येथील 45 वर्षीय शेतकरी अनिल रघुनाथ पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आज (सोमवार) सकाळच्या सुमारास काळवट नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

मृत शेतकरी
author img

By

Published : Nov 4, 2019, 10:07 PM IST

सातारा - मरळी (ता. पाटण) येथील 45 वर्षीय शेतकरी अनिल रघुनाथ पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आज (सोमवार) सकाळच्या सुमारास काळवट नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याची फिर्याद अनिकेत उत्तम पाटील यांनी पाटण पोलिसात दिली आहे.

दरम्यान, राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सरकारच स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पाटण तालुक्यातील कर्जामुळे आत्महत्या केलेला हा पहिला बळी गेला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांत सरकार विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटणपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या मरळी गावातील शेतकरी अनिल रघुनाथ पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी मरळी विकास सेवा सोसायटीतून कर्ज घेतले होते. त्यातच जून महिन्यापासून आजपर्यंत पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात शेतकरी अनिल पाटील यांचे देखील नुकसान झाले आहे. अनिल पाटील यांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज फेडता आले नाही. या कर्जाला कंटाळूनच त्यांनी आज (सोमवार) सकाळच्या सुमारास मरळी गावातील काळवट नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याची फिर्याद अनिकेत उत्तम पाटील यांनी पाटण पोलिसात दिली असून अधिक तपास हणमंत पाटील करत आहेत.

शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा हा पहिला बळी गेला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Intro:सातारा (ता. पाटण) येथील 45 वर्षीय शेतकरी अनिल रघुनाथ पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी सकाळच्या सुमारास काळवट नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याची फिर्याद अनिकेत उत्तम पाटील यांनी पाटण पोलिसात दिली आहे. Body:दरम्यान, राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सरकारच स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पाटण तालुक्यातील कर्जामुळे आत्महत्या केलेला हा पहिला बळी गेला आहे. हे सरकारी अनास्थेचे पापच म्हणावे लागेल. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्यात सरकार विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटणपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या मरळी गावातील शेतकरी अनिल रघुनाथ पाटील (वय 45) यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी मरळी विकास सेवा सोसायटीतून कर्ज घेतले होते. त्यातच जून महिन्यापासून आजअखेर पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात शेतकरी अनिल पाटील यांचे देखील नुकसान झाले आहे. अनिल पाटील यांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले होते. या कर्जाला कंटाळूनच त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास मरळी गावातील काळवट नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याची फिर्याद अनिकेत उत्तम पाटील यांनी पाटण पोलिसात दिली असून अधिक तपास हणमंत पाटील करत आहेत.

Conclusion:शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा हा पहिला बळी गेला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू होईल की काय? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होवून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.