सातारा : गेल्या दोन आठवड्यात बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगबाबत अधिक कडक धोरण करावे लागेल. त्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली असून आज रात्री त्याबाबतची नवी नियमावली जिल्हाधिकारी जाहीर करतील, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
'रात्रीपर्यंत कडक लाॅकडाऊनची नियमावली'
बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कर्यकारी अधिकारी श्री. गौड यांची आपण बैठक घेतली. आमचे मुद्दे त्यांच्यापुढे मांडले आहेत प्रशासन योग्य ते विचार करुन रात्रीपर्यंत कडक लाॅकडाऊनची नियमावली काढेल.
हेही वाचा - संगमनेरमधील नव्वदीतील आजी-आजोबांची कोरोनावर मात