ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक ११९ कोरोनाबाधितांची नोंद, दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 16, 2020, 9:13 PM IST

जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 119 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 73 झाली असून 851 बाधित जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 72 झाली आहे.

सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधित ११९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

सातारा : जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 119 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर, वाई तालुक्यातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याबाबतची माहिती शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. बुधवारी रात्री उशिरा हे अहवाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार निकट सहवासित 114, प्रवास करुन आलेले 2 व सारी बाधित 3 असे हे 119 रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील पुनवडी गावातील सर्वाधिक 30 रुग्ण कोरोनाबाधित निघाले आहेत. यात 3 व 5 वर्षांच्या दोन बालकांचाही समावेश आहे. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचाही यात समावेश आहे. याशिवाय कोरेगाव तालुक्यातील 8, सातारा 15, वाई 16, कराड 10, खंडाळा 26, खटाव 5, फलटण 2, महाबळेश्वर 1 आणि पाटण तालुक्यातील 6 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 73 झाली असून 851 बाधित जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 72 झाली आहे.

दोन बाधितांचा मृत्यू -

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही व सोनगीरवाडी येथील कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.