सातारा - जिल्ह्यात नवे 52 कोरोनाबाधित आढळले झाले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 394 वर तर मृतांची संख्या 11 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
बुधवारी सकाळी जिल्ह्यातील नागरीकांना कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा हादरा दिला. तब्बल 52 नव्या रुग्णांची भर पडली असून वाई तालुक्यातील आसले व पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या 394 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात 257 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 126 रुग्णांना ते कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना बाधितांची तालुकानिहाय स्थिती :
माण - म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1, लोधवडे-2, सातारा - जिमनवाडी 2, खडगाव-1, कुस बुद्रुक - 1, वाई - आकोशी 1, आसले - 1, मालदपूर - 1, देगाव - 1, सिद्धनाथवाडी - 1 , धयाट - 1, पाटण-धामणी - 4, गलमेवाडी - 1, मन्याचीवाडी - 1, मोरगिरी - 2, आडदेव -1, नवारस्ता - 1, सदुवरपेवाडी - 2, जांभेकरवाडी - 1 (मृत्यु), खंडाळा - अंधोटी 2, घाटदरे - 1, पारगाव -7, जावळी - सावरी - 3, केळघर - 2, महाबळेश्वर - कासरुड - 3, देवळी - 3, गोळेवाडी - 1, कराड - खरोड - 2, म्हासोली - 1, वानरवाडी - 1, उंब्रज - 1*फलटण- सस्तेवाडी - 1 ,खटाव- वांझोळी - 1, वरची अंभेरी - 1