ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर ; बुधवारी 922 कोरोनाबाधित; 5 बाधितांचा मृत्यू - सातारा कोरोना बातमी

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 922 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

satara
सातारा रुग्णालय
author img

By

Published : Apr 8, 2021, 1:01 AM IST

सातारा - जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 922 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. गेल्या ७ महिन्यातील जिल्ह्यात ही सर्वोच्च संख्या आहे. तर 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लसीचा साठा संपल्याने लसीकरण थांबविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

हेही वाचा - ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू

5 बाधितांचा मृत्यू

अहवालप्राप्त कोरोना बाधितांमध्ये सातारा व फलटण तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे फलटण येथील 45 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये शेणोली ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, धावडवाडी ता. आटपाडी जि. सांगली येथील 38 वर्षीय महिला अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचे शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण

सातारा जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहिम थांबवावी लागत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

काळाबाजार रोखण्याचे आदेश

जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सीजन, रेमिडिसवर इंजेक्शन व अन्य अनुषंगिक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी तात्काळ नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांना केल्या आहेत. जिल्ह्यात औषधांचा काळाबाजार, अवैध साठेबाजी होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, ‍अशा सक्त सुचनाही करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील स्थिती

एकूण नमुने - 4 लाख 22 हजार 301

एकूण बाधित -70 हजार 137

घरी सोडण्यात आलेले -61 हजार 948

मृत्यू - 1 हजार 936

उपचारार्थ रुग्ण- 6 हजार 253

हेही वाचा - लसीच्या तुटवड्यानंतर पालिकेला जाग; कांजूर लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.