सातारा : शरद पवार हे सोमवारी दुपारी कराडमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. या दौऱयावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नवीन व तरुण नेत्यांची फळी (Sharad Pawar Young Brigade) दिसून आली आहे. त्यामुळे शरद पवार यांना यातून नेमके काय दर्शवायचे हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

शरद पवारांसोबत तरुणांची फळी - शरद पवार हे सोमवारी कराड येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक तरुण नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील, दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील, विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर हे राष्ट्रवादीचे तरुण चेहरे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून आले. यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार अतुल बेनके हे नेते देखील शरद पवार यांच्यासोबत आज दिसून आले. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत तरुणांची नवी फळी असल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्येष्ठ नेते अजित पवारांसोबत? : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून आले.

जयंत पाटलांचे चिरंजीव मैदानात - जयंत पाटील भक्कमपणे शरद पवारांसोबत आहेत. जयंत पाटील सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव प्रतिक पाटील शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासह कराडमध्ये आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली.
हेही वाचा -