ETV Bharat / state

शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर, कोरोना आढावा बैठक घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचा कराड येथील बैठकीत आढावा घेणार आहेत.

Sharad pawar visit satara
Sharad pawar visit satara
author img

By

Published : Aug 9, 2020, 11:34 AM IST

सातारा - देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचा कराड येथील बैठकीत आढावा घेणार आहेत.

यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित राहणार आहेत. सहकार व पणन मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित राहतील. आज कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक पार पडणार आहे.

तत्पूर्वी शरद पवार यांनी माण तालुक्याला काही वेळासाठी भेट दिली. माणमध्ये त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि तालुक्यातील कोरोना संदर्भात माहिती घेतली. 'माण मध्ये यंदा चांगला पाऊस पडला आहे. हिरवळ दिसतेय, सगळ्यांनी काळजी घ्या', असे सांगून पवार यांचा ताफा खटाव तालुक्याकडे मार्गस्थ झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.