ETV Bharat / state

Udayanraje Bhosale: उदयनराजेंच्या समर्थकावर खुनी हल्ला, तीन संशयितांना अटक - दीपक उर्फ आप्पा मांढरे

जवाडा परिसरात खासदार उदयनराजेंचे (Udayanraje Bhosale) समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर खुनी हल्ला झाल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण होते. (attack on supporter of Udayanraje Bhosale).

उदयनराजेंच्या समर्थकावर खुनी हल्ला
उदयनराजेंच्या समर्थकावर खुनी हल्ला
author img

By

Published : Nov 10, 2022, 10:21 PM IST

Updated : Nov 10, 2022, 10:53 PM IST

सातारा - खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे समर्थक दीपक उर्फ आप्पा मांढरे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून बुधवारी रात्री अकराच्या सुमारास गोळ्या झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. (attack on supporter of Udayanraje Bhosale). या हल्ल्यात मांढरे यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासात मुख्य संशयित प्रणव शैलेश पाटोळे (वय १९, रा. खंडोबाचा माळ, सातारा) याच्यासह तीन हल्लेखोरांना अटक केली आहे.

सातारा शहरात दिवसभर तणाव - राजवाडा परिसरात खासदार उदयनराजेंचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर खुनी हल्ला झाल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण होते. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. घटनेनंतर राजवाडा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या - खासदार उदयनराजेंचे समर्थक आप्पा मांढरे हे साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये उभे असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यांच्या पोटात गोळ्या लागल्याने ते कोसळले. गोळीबाराची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस व सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी मांढरे यांना पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

एलसीबीने संशयितांना पकडले - राजवाड्यानजीकच्या गोल बागेजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हल्लेखोर सातारा शहरातील असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ते खंडोबाचा माळ परिसरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार संशयितांना पोलिसांनी अटक केली.

Last Updated : Nov 10, 2022, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.