सातारा- कराडनजीकच्या मलकापुरातील दांगट झोपडपट्टीत बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मलकापूरसह कराड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विकास लघुनाथ लाखे असे मृताचे नाव असून गणेशोत्सवापूर्वी झालेल्या गँगवारचा या घटनेशी संबंध असल्याचा संंशय पोलिसांनी वर्तवला आहे.
कराडमधील कुख्यात गुंड पवन सोळवंडे याचा गणेशोत्सवापूर्वी खून झाला होता. त्यामुळे कराडात गँगवार भडकण्याची भीती होती. त्यामुळे पोलिसांनी गुंडांच्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत करवाई केली. मात्र, गँंगवारने पुन्हा डोेके वर काढले आणि त्यातूनच मलकापूरच्या दांगट वस्तीतील विकास लाखे याचा खून झाला. यामागे पवन सोळवंडे याच्या खुनाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विकास लाखे याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत पोलीस आरोपींचा शोध घेत होते. हल्लेखोर तोंडाला मास्क लावून मोटरसायकलवरून आले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. घटनेनंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. तसेच कराडसह मलकापूरात राखीव दलाचे पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.