ETV Bharat / state

खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज.. लुंगी घालून येत 'पुष्पा'तील 'सामी सामी' गाण्यावर उडवली कॉलर - उदयनराजे व्हायरल व्हिडीओ

आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांचा हटके अंदाज पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे. साताऱ्यातील सेल्फी पॉईंटवर ( Udayanraje On Selfie Point ) लुंगी घालून येत पुष्पा सिनेमातील 'सामी सामी' गाण्यावर ( Saami Saami Song Pushpa The Rise ) त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( Udayanraje Viral Video ) होत आहे.

खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज.. लुंगी घालून येत 'पुष्पा'तील 'सामी सामी' गाण्यावर उडवली कॉलर

author img

By

Published : Jan 16, 2022, 11:55 PM IST

सातारा : साताऱ्याचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांनी आज पोवई नाक्यावरील 'राजधानी सेल्फी पॉईंट'वर चक्क 'लुंगी' घालून फोटो सेशन ( Udayanraje On Selfie Point ) केलं.

खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज.. लुंगी घालून येत 'पुष्पा'तील 'सामी सामी' गाण्यावर उडवली कॉलर

मोटारीत बसतांना उडवली कॉलर

झालं असं रात्री खासदार उदयनराजे सातारच्या पोवई नाक्यावरील सेल्फी पॉइंटवर ( Rajdhani Selfie Point Satara ) आले होते. त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने पांढरी लुंगी परिधान केली होती. खासदार उदयनराजे यांनी निवडक कार्यकर्त्यांसमवेत लुंगी घालून हटके एन्ट्री केली. तिथं त्यांनी फोटोसेशनही केले. त्यानंतर मोटसरीत बसताना त्यांनी 'पुष्पा'तील गाण्यावर ( Saami Saami Song Pushpa The Rise ) पुन्हा एकदा कॉलर उडवली.

लुंगी घातली कि बरं वाटत

खासदार उदयनराजे यांच्या हटके स्टाईलवर तरुणाई फिदा आहे. आज त्यांनी चाहत्यांना अनोखा अंदाज दाखवत खुश केले. यावेळी त्यांना माध्यमांनी लुंगी घालण्याचे कारण विचारताच, 'मला बरं वाटत', असे सांगितले. हटके स्टाईलमुळे लाखो फॉलोअर्स सातारकरांना नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत पुन्हा एकदा त्यांनी कॉलर उडवली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात साताऱ्यातील उदयनराजेंचे चाहते लुंगी घालून दिसतील यात शंका नाही. स्वत: च्या हटके स्टाईलमुळे सोशल मिडीयावर फॉलोअर्स मिळवणारे उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.