सातारा - जिल्ह्यात मागील 24 तासांत 2 हजार 83 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. बाधितांच संख्या मोठी असली तरी बाधीतांचा दर 17.22 टक्के इतका कमी आला, ही दिलासा देणारी बाब ठरली. दुर्दैवाने 35 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. डाॅ. आठल्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 12 हजार 97 संशयित नागरिकांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 2 हजार 83 नवे बाधित निष्पन्न झाले.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या पुढील प्रमाणे
सातारा - 376
फलटण - 364
खटाव - 319
कराड - 243
खंडाळा - 172
कोरेगांव - 184
माण - 140
वाई - 118
जावली - 32
महाबळेश्वर - 17
पाटण - 92
इतर - 26
खटावमध्ये 7 बळी
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी - 2, कराड - 6, खंडाळा - 2, खटाव - 7, कोरेगाव - 3, माण - 1, पाटण - 5, सातारा - 6, वाई - 3 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 425 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1 हजार 198 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1 हजार 198 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सध्या 18 हजार 663 रुग्ण सध्या सक्रीय आहेत.
हेही वाचा - भूकंपाच्या धक्क्याने सातारा हादरला; रिश्टरस्केलवर 2.9 तीव्रतेची नोंद