ETV Bharat / state

साताऱ्यात आज नव्या 1 हजार 667 कोरोनाबाधितांची नोंद; तर 21 रुग्णांचा मृत्यू - सातारा कोरोना अपडेट

गेल्या 24 तासांत 1 हजार 667 नागरिकांचे कोरोनाचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर 21 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

satara corona news
साताऱ्यात आज नव्या 1 हजार 667 कोरोनाबाधितांची नोंद; तर 21 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 1, 2021, 9:40 PM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 667 नागरिकांचे कोरोनाचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर 21 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.

सातारा-फलटण अव्वल -

काल आलेल्या बाधितांमधे सातारा व फलटण तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. तर जावळीत 109, कराड 206, खंडाळा 79, खटाव 189, कोरेगाव 114, माण 92, महाबळेश्वर 14, पाटण 106, सातारा 345, वाई 67 व इतर 7 असे बाधित तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 67 हजार 792 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 11 हजार 339 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 667 कोरोनाबाधित निघाले. जिल्ह्याचे आजचे बाधितांचे प्रमाण 14.70 टक्के इतके आहे.

साताऱ्याने ओलांडला हजाराचा टप्पा -

आज मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये कराड 4, खटाव 1, कोरेगाव 2, माण 1, फलटण 2, सातारा 11 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 677 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 20 हजार रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे -

दरम्यान, जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. लसीकरण केंद्रावर नागरिकांना टोकन दिल्यानंतर त्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 या वेळेतच लसीकरण करावे. जो नागरिक कोरोनाबाधित झाला आहे, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घ्यावा. तिसर्‍या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? मुलावर नको ती बंधने घालण्याची गरज नाही - तज्ज्ञ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.