ETV Bharat / state

Raju Shetty on Modi : मोदींनी जग पाहिले, आता आपला देश फिरून पाहावा; राजू शेट्टींचा खोचक टोला - कृषिमंत्री अब्दुल सत्तार

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) चांगली बाब आहे. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचे जग फिरून झाले आहे. तीन महिने वेळ काढून त्यांनी आता देशही फिरून पाहावा. म्हणजे त्यांना वस्तुस्थिती समजेल, असा खोचक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Self-respecting Farmers Association ) नेते, माजी खासदार राजू शेट्टी ( Former MP Raju Shetty ) यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत लगावला.

Raju Shetty on Modi
Raju Shetty on Modi
author img

By

Published : Nov 12, 2022, 10:52 PM IST

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जग फिरून झाले आहे. आता देशही फिरून पाहावा. म्हणजे त्यांना वस्तुस्थिती समजेल, असा खोचक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Self-respecting Farmers Association ) नेते, माजी खासदार राजू शेट्टी ( Former MP Raju Shetty ) यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत लगावला. तसेच सरकारमधील सगळे जण सत्तेची लालसा असणारे आहेत. सत्तेचा ते पुरेपूर लाभ घेतील. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटत नसल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

शेतकरी म्हणून निवडणूक लढविणार - आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना शेट्टी म्हणाले की, मी सगळे राजकीय प्रयोग करून पाहिले आहेत. आता मी फक्त शेतकर्‍यांच्या बरोबर आहे. राहणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एक शेतकरी म्हणून मी उमेदवार असेन. कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी वटपट बंद करावी. केवळ फोटो काढण्यापुरते बांधावर जाऊ नये. शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान, समस्या जाणून घ्याव्यात आणि मर्यादेत राहून कृषी मंत्री म्हणून प्रामाणिक काम करण्याचा सल्ला शेट्टी यांनी अब्दुल सत्तारांना दिला.

राज्यात दोन दिवस लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन - यंदाच्या हंगामात कारखानदारांनी संपुर्ण एफआरपी आणि गळीत हंगाम संपल्यानंतर उर्वरीत 350 रूपये द्यावेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 17 व 18 नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. शेतकर्‍यांनी ऊस तोडी घेऊ नयेत आणि ऊस वाहतूक करु नये. ऊसतोड आणि वाहतूक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकार विरोधात बोलण्याची साखर कारखानदारांमध्ये हिंमत नाही. मग आम्ही संघर्ष करत असताना कारखानदारांनी त्यात खोडा न घालता पाठिंबा देण्याची मागणीही त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.