सातारा - बँकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, बोगस बियाणे व खते, सोयाबीनची दुबार पेरणी, अतिवृष्टी, खतांच्या तुटवडा आणि काळाबाजार, वादळ अशा अनेक संकटांनी राज्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. दुधाचे दर कमी झाल्याने तर शेतकरी पुरता कोलमडून गेले आहेत. सरकारने संवेदनशिलता दाखवून दुधाच्या दरवाढीबरोबरच प्रतिलिटर 10 रुपये तसेच दूध भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वाअरे केली आहे.
आमदार गोरे यांनी प्रांत आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की राज्यातील शेतकरी अनेक संकटांमुळे अडचणीत सापडले आहेत. असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात एक कोटी चाळीस लाख लीटर गाईच्या दुधाचे उत्पादन होते. 35 लाख लीटर सहकारी संस्था, 90 लाख लीटर खासगी संस्था आणि डेअरीमार्फत खरेदी केले जाते. 15 लाख लीटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल्स आणि घरगुती ग्राहकांना पुरवतात. शासकीय योजनेद्वारे अत्यल्प दूध खरेदी केले जाते.
शासनाने गायीच्या दुधाला प्रतीलीटर 10 रुपये, दूध भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे तसेच 30 रुपये लीटर दराने दुधाची खरेदी करावी या मागण्यांसाठी 1 ऑगस्टला महायुतीच्या घटक पक्षांकडून राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाबरोबर मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांना गायीचे दूधही पाठविण्यात आले. गायीचे दूध प्राशन करुन न्याय बुध्दीने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
दूध दरवाढीसह भुकटीला अनुदान द्या - आमदार गोरे - सातारा जिल्हा बातम्या
शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधामागे 10 रुपये तर प्रति किलो, दूध भुकटीमागे 50 रुपये अनुदान देण्यात यावे यासाठी आमदार जयकुमार मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. हे निवेदन तहसिलदारामार्फत देण्यात आले आहे.