ETV Bharat / state

हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - satara district news

सिक्कीमजवळ कर्तव्यावर असताना अपघातात हुतात्मा झालेले चिंचणवर निंब येथील जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. 23 डिसें.) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुखाग्नी देताना आर्यन
मुखाग्नी देताना आर्यन
author img

By

Published : Dec 23, 2020, 8:03 PM IST

सातारा - सिक्कीमजवळ कर्तव्यावर असताना अपघातात हुतात्मा झालेले चिंचणवर निंब (ता. सातारा) येथील जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. 23 डिसें.) चिंचणेर निंब येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून त्यांना मानवंदना दिली.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलीस अधीक्षक‍ आंचल दलाल, कमांडर स्टेशन हेडक्वार्टर, कोल्हापूरचे कर्नल पराग गुप्ते यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

रविवारी दुर्दैवी अपघात

हवालदार सुजीत किर्दत यांच्यासह पाच जण जिपमधून प्रवास करत होते. रविवारी (दि.20 डिसें.) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन सिक्कीम येथील चिन सरहद्दीजवळ दरीत कोसळले. त्यात हवालदार किर्दत यांच्यासह दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. मंगळवारी (दि. 22 डिसें.) सायंकाळी त्यांचे पार्थिव दिल्लीत तर बुधवारी सकाळी विमानाने पुण्यात आणण्यात आले. दुपारी सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे शहीद किर्दत यांच्या गावी पोहचले.

जय घोषाने परिसर दुमदुमला

हुतात्मा जवान सुजित किर्दत यांना मानवंदना देऊन कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्करी वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे बॅनर लागले होते. 'अमर रहे अमर रहे सुजित किर्दत अमर रहे, भारत माता की जय,' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा कृष्णा नदीकाठी, अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली.

सैन्य व पोलीस दलाची मानवंदना

सैन्य दल व पोलीस दलामार्फत पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. पिता नवनाथ, पत्नी सुवर्णा, मुलगा आर्यन, मुलगी इच्छा, भाऊ अजित यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. गावावर शोककळा पसरली होती. ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुने उभे राहून हुतात्मा जवान किर्दत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अकरा वर्षाच्या आर्यनने दिला मुखाग्नी

हुतात्मा सुजित किर्दत यांचा अकरा वर्षीय मुलगा आर्यनने पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, साताराच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्यासह लष्कराचे विविध आजी-माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा - महाबळेश्वरला फिरायला आलेल्या कारला केळघरजवळ अपघात: चालक ठार

हेही वाचा - 'थर्टी फस्ट'साठी कास, वासोट्याचा प्लॅन करत असाल तर थांबा..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.