ETV Bharat / state

Coronavirus : कोरोनाबद्दल जनजागृती आणि मदतीसाठी सरसावले हात - Many are raising awareness about Corona virus

समाजात कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी नगराध्यक्ष सतीश जाधव यांच्या संकल्पनेतून दहिवडी शहरातील प्रमुख रस्त्यावर पेंटींग करून प्रभोधनात्मक स्लोगन व चित्रे रेखाटली जात आहेत. रस्त्यावरील स्लोगन आता लक्षवेधी ठरत आहेत. रस्त्यावर रेखाटलेले चित्रे पाहून आपसुकच नागरिकांचे पाय घराकडे वळू लागले आहेत.

Corona virus
कोरोनाबद्दल जनजागृती आणि मदतीसाठी सरसावले हात
author img

By

Published : Apr 4, 2020, 10:44 AM IST

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्व जनतेला घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जनतेनेही या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अपवादात्मक अत्यावश्यक यंत्रणा वगळता सर्वांनीच घराबाहेर न पडता आपल्या घरातच राहून या कोरोना बाबतची सावधानता व खबरदारी घेतली असल्याचे पहिला मिळत आहे. तर घरोघरी यासंबंधी कार्यरत असलेल्या यंत्रणासाठी कृतज्ञताही व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच न्यायव्यवस्था देखील मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिसत आहेत.

कोरोनाबद्दल जनजागृती आणि मदतीसाठी सरसावले हात
  • कोरोनाबद्दल जनजागृती -

समाजात कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी नगराध्यक्ष सतीश जाधव यांच्या संकल्पनेतून दहिवडी शहरातील प्रमुख रस्त्यावर पेंटींग करून प्रभोधनात्मक स्लोगन व चित्रे रेखाटली जात आहेत. रस्त्यावरील स्लोगन आता लक्षवेधी ठरत आहेत. रस्त्यावर रेखाटलेले चित्रे पाहून आपसुकच नागरिकांचे पाय घराकडे वळू लागले आहेत. नगराध्यक्ष जाधव यांनी राबवलेल्या या अनोख्या संकल्पनेचे जनतेतून कौतुक होत आहे. करोनाविषयी प्रभोधनासाठी अश्या प्रकारे जिल्ह्यात पहिल्यांदा संकल्पना राबवणारे दहिवडी हे पहिले शहर ठरले आहे.

  • गटविकास अधिकारी यांनी स्वतःच केली फवारणी -

माण पंचायत समितीमध्ये कोरोणा विषाणू प्रतिबंधक फवारणी स्वतः गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी केल्याचे पाहायला मिळाले. शासकीय कर्मचारी यांच्यावरचा वाढता ताण तसेच आरोग्य विभागाची जबाबदारी पार पाडत असताना आपल्या कार्यालयात स्वच्छता व फवारणी ते स्वतः करताना दिसले.

  • न्यायव्यवस्था मदतीसाठी सरसावली -

दहिवडी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश अमितसिंह मोहने हे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबातील नागरिकांना पोलिसांच्या समवेत मदत करत आहेत. तसेच जनजागृती करत आहेत.

  • अन्नदानाचा वारसा -

आपत्कालीन परिस्थितीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा अन्नदानाचा वारसा समाधी मंदिर समितीने जोपासला आहे. राज्य-परराज्यातील सातारा जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांची भूक भागवण्यासाठी कोरडा शिधा घरपोच दिला जातो आहे. यामध्ये 1 हजार कुटुंबातील नागरिकांना 2 दिवसात शिदा वाटप करण्यात आला आहे.

  • पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला हातभार -

श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीमध्ये 50 लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.