ETV Bharat / state

'मकर संक्रांत' का साजरा केला जातो, या सणाचे नेमके महत्व काय? जाणून घेऊया - makar sankranti in rural area

वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीआधी दिवस लहान तर रात्र मोठी असते मात्र, या दिवसानंतरच दिवस आणि रात्र समान होतात

ग्रामीण भागातील मकर संक्रांत सण
ग्रामीण भागातील मकर संक्रांत सण
author img

By

Published : Jan 13, 2020, 5:16 PM IST

सातारा - नव्या वर्षाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच महिन्यात 15 जानेवारीला मकर संक्रांत हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढेच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र, या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. या सणाला तिळाचे विशेष महत्त्व असते. या दिवसात प्रचंड प्रमाणात थंडी असते आणि तिळाचे सेवन केल्याने शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून विविध पदार्थ बनवून खाण्यास सुरुवात झाली.

ग्रामीण भागातील मकर संक्रांत

संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे, असे लहान मुलांना वाटते. 'मकर' ही रास असल्याचे सर्वांना माहित आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. याच प्रक्रियेला 'मकर संक्रांत', असे म्हटले जाते. दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रमण, त्यामुळे या सणाला 'मकर संक्रांत' असे म्हटले जाते.

मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे जो प्रत्येक वर्षी एकाच तारखेला येतो. परंतु, हा सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी-कुंकू आणि वाण देतात. महिला मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करतात. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येते. थोडक्यात महिलांसाठी संक्रांत हा महत्त्वाचा सण आहे.

हेही वाचा - अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू

या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासही विशेष महत्त्व असते. अनेकदा सणासुदीला काळा रंग वर्ज्य करण्यात येतो. मात्र, मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते आणि काळा रंग उष्णता शोषून घेत असल्यामुळे या दिवशी काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात. तसेच या दिवशी हलव्याचे दागिनेही घालण्याची प्रथा आहे.

हेही वाचा - तुलना अयोग्यच..! 'मोदींनी 'त्या' पुस्तकाचे वितरण थांबवून अतिउत्साहींना आवर घालावा'

Intro:सातारा नव्या वर्षाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच महिन्यात 15 जानेवारीला मकर संक्रांत हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढचं शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते. या दिवसात प्रचंड प्रमाणात थंडी असते. तिळाचे सेवन केल्याने शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. तसेच तिळापासून विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. मकर संक्रात नेमकी का साजरी केली व ग्रामीण भागात महिला कश्या प्रकारे केली जाते हे जाणून घेणार आहोत.

Body:संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो.मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे, असं लहान मुलांना वाटतं. तसचं 'मकर' ही रास असल्याचंही सर्वांना माहित आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला 'मकर संक्रांत', असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे या सणाला 'मकर संक्रांत' असं म्हटलं जातं. 

मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे जो प्रत्येक वर्षी एकाच तारखेला येतो. परंतु, हा सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी महिला मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी-कुंकू आणि वाण देतात. महिला मंडळ मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांसाठी संक्रांत हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासही विशेष महत्त्व असतं. त्यामागेही शास्त्रीय कारण असतं. अनेकदा सणासुदीला काळा रंग वर्ज्य करण्यात येतो. मात्र, मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या दिवशी काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात. तसेच या दिवशी हलव्याचे दागिनेही घालण्याची प्रथा आहे.

Conclusion:व्हिडिओ
बाईट
1) गुरलिंग स्वामी, सातारा
2)हौसाबाई खांडे, सातारा
3) बांगडी व्यावसायीक
4)चुडे बांगड्या व्यापारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.