ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवार पेटवणार रान; उद्या प्रितीसंगमावर जाऊन घेणार दर्शन, मग आखणार रणनीती - उपमुख्यमंत्री पदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या बंडाबाबत शरद पवार रान उठवणार असल्याचे दिसून येत आहे. उद्या कराड येथील प्रितीसंगमावर जाऊन शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 2, 2023, 11:08 PM IST

सातारा : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोमवारी तातडीने कराड दौऱ्यावर येत आहेत. प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत. शरद पवार यांनी आपण जनतेत जाऊन आगामी निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रितीसंगमावर जाऊन अजित पवार यांच्या बंडाबाबतची आपली भूमिका माध्यमांसमोर आपण स्पष्ट करणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवारांच्या कराड दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे

शरद पवार उद्या प्रीतिसंगमावर : अजित पवारांनी आज राजकीय भूकंप करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. या घडामोडींनंतर शरद पवार सोमवारी कराडमध्ये येऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधून राजकीय घडामोडींवर भाष्य करणार आहेत.

कराड उत्तरचे आमदार एकनिष्ठ : यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी, माजी आमदार पी. डी. पाटील यांचे सुपूत्र आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. गेली पाच टर्म ते सलग आमदार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राजकारण करताना त्यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाही. शरद पवारांच्या भूमिकेशी आपण एकनिष्ठ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

अजितदादांच्या निर्णयाबद्दल आश्चर्य : अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आपणाला कल्पना नव्हती. माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही, असे बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा होती. मात्र हा विस्तार अशा पद्धतीने होईल, असे वाटले नव्हते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार मांडणार भूमिका : अजित पवार इतक्या तातडीने निर्णय घेतील, असे वाटले नव्हते. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कराडला येत आहेत. त्यावेळी या सर्व घडामोडींवर अधिक चर्चा होईल. तेच संपूर्ण घडामोडींचा खुलासा करतील, असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : आम्ही काँग्रेस-NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, मग आता...; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  2. Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या सविस्तर
  3. NCP Political Crisis : भावाच्या बंडानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया; एकाच शब्दात दिले उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.