ETV Bharat / state

सातारा, माढा लोकसभा मतदारसंघातील हालचालींना वेग; उमेदवारांच्या गावभेटी वाढल्या - villege visit

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक असणारे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीचा तिढा मुंबईत जिल्ह्यातील आमदार व सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत सुटला आहे. उदयनराजेंच्या विरोधात अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी अनेक इच्छुक मात्र तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

शरद पवार
author img

By

Published : Mar 11, 2019, 12:14 PM IST

सातारा - अनेक दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जनसामान्यांपासून ते उमेदवारांपर्यंत लागलेली उत्सुकता अखेर संपुष्टात आली. निवडणूक आयोगाने काल (रविवार) निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या गावभेटी वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा या दोन्ही मतदार संघाचे मतदान तिसऱ्या टप्प्यात (२० एप्रिलला) होणार असून राज्यातील दोन दिग्गज नेते या मतदारसंघातून पुन्हा एकदा आपले नशीब आजमावणार आहेत. सहाजिकच राज्याबरोबर देशाचे लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक असणारे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीचा तिढा मुंबईत जिल्ह्यातील आमदार व सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत सुटला आहे. उदयनराजेंच्या विरोधात अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी अनेक इच्छुक मात्र तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

माढा मतदारसंघात जिल्ह्यातील माण-खटाव, फलटण, कोरेगाव उत्तर हे मोठे तालुके येतात. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे या ठिकाणी पक्षांची मोठी नाचक्की झालेली पाहायला मिळते. त्यामुळे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या ठिकाणी लढणार आहेत. तसेच माढा मतदारसंघात सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांमध्ये येणाऱ्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याबरोबर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Intro:सातारा गेल्या अनेक दिवसांपासून आगामी निवडणुकीबाबत जनसामान्यांपासून उमेदवारांपर्यंत लागलेली उत्सुकता अखेर संपुष्टात आले असून निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा या दोन्ही मतदार संघाचे मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ते वीस एप्रिलला होणार असून राज्यातील दोन दिग्गज नेते या मतदारसंघातून पुन्हा एकदा आपले नशीब आजमावणार आहेत. सहाजिकच राज्याबरोबर देशाचे लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे.

Body:सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक असणारे विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीचा तिढा मुंबई येथे सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार व व सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासमवेत सुटला आहे. उदयनराजेंच्या विरोधात अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी अनेक इच्छुक मात्र तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

माढा मतदारसंघात जिल्ह्यातील माण- खटाव, फलटण, कोरेगाव उत्तर हे मोठे तालुके येतात. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे या ठिकाणी पक्षांची मोठी नाचक्की झालेली पाहायला मिळते. त्यामुळे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या ठिकाणी लढणार आहेत. तसेच माढा मतदारसंघात सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांमध्ये येणाऱ्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याबरोबर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.